महिला आशिया कपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला. श्रीलंकेने पाकिस्तानचा 3 गडी राखून पराभव करत फायनलमध्ये एंट्री केले आहे. याआधी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बांग्लादेशचा पराभव केला होता. अशा प्रकारे अंतिम फेरीत श्रीलंकेसमोर भारतीय संघाचे आव्हान असेल. श्रीलंकेसमोर विजयासाठी 141 धावांचे लक्ष्य होते. चमारी अटापट्टूच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेने 19.5 षटकांत लक्ष्य गाठले. श्रीलंकेकडून कर्णधार चामारी अट्टापत्तूने सर्वाधिक धावा केल्या.
चामारी अट्टापत्तूने 48 चेंडूत 63 धावांची शानदार खेळी केली. तिने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 1 षटकार मारली. याशिवाय अनुष्का संजीवनी 22 चेंडूत 24 धावा करून नाबाद परतली. खरेतर, श्रीलंकेचे फलंदाज ठराविक अंतराने विकेट्स देत होत्या, पण कर्णधार चमारी अटापट्टूने एक टोक सांभाळून फलंदाजी करत या अटीतटीच्या सामन्यात आपल्या संघाला विजय मिळवून दिली. तिच्या या साहसी खेळीने कर्णधार मारी अटापट्टूला सामनावीर पुरस्कार देण्यात आले.
पाकिस्तानसाठी सादिया इक्बाल ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. सादिया इक्बालने 4 षटकात 16 धावा देत 4 फलंदाज बाद केले. याशिवाय निदा दार आणि ओमामा सोहेल यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.
तत्पूर्वी, पाकिस्तानची कर्णधार निदा दार हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 140 धावा केल्या. पाकिस्तानकडून मुनिबा अलीने 34 चेंडूत सर्वाधिक 37 धावांचे योगदान दिले. गुल फिरोझाने 24 चेंडूत 25 धावा केल्या. याशिवाय कर्णधार निदा दार आणि फातिमा सना यांनी 23-23 धावांची उपयुक्त खेळी खेळली. श्रीलंकेच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर उदेशिका प्रबोधिनी आणि कविशा दिलहारी यांना प्रत्येकी 2 यश मिळाले.
पहिल्या सेमीफायनलमध्ये खेळल्या गेल्या भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात टीम इंडियाने बांग्लादेशचा दारुण पराभव केला. आशा स्थितीत फायनलमध्ये भारत विरुद्ध श्रीलंका सामना रंगणार आहे. हा सामना उद्या (28 जुलै) रोजी होणार आहे. दोन्हा संघ यंदाच्या स्पर्धेतील एकही सामना गमावले नसल्याने अंतिम सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा-
“तू खालच्या दर्जाचा माणूस…”, हरभजनवर टीका करताना पाकिस्तानी खेळाडूची जीभ घसरली
देशाला लवकरच मिळणार गुड न्यूज! भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं पदक जवळपास निश्चित
विराटनंतर रिंकू सिंगने सूर्यकुमार यादवकडे मागितली बॅट, पण नव्या कर्णधाराने केलं असं काही