---Advertisement---

राडा! टीम इंडियाकडून पराभूत झाल्यानंतर श्रीलंकेच्या कोच-कर्णधाराचा पीचवर राडा, अगदी…

---Advertisement---

कोलंबो| मंगळवार रोजी श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेला दुसरा वनडे सामना अतिशय रोमांचक राहिला. श्रीलंकेच्या फलंदाजांनी जबरदस्त फटकेबाजी करत भारताला २७६ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरादाखल ३६ व्या षटकापर्यंत भारताचे आघाडीचे ७ फलंदाज १९३ धावांवर माघारी परतले होते. परंतु गोलंदाज दिपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी शेटपर्यंत चिवट झुंज देत श्रीलंकाच्या जबड्यातून विजय खेचून घेतला आणि ३ विकेट्सने सामना जिंकत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

यानंतर पराभूत झालेल्या श्रीलंका संघाच्या प्रशिक्षकांनी मैदानातच अनपेक्षित कृती केली, ज्याची सध्या आजी-माजी क्रिकेटपटूंपासून ते चाहत्यापर्यंत सर्वच जण टिका करत आहेत.

तर झाले असे की, फलंदाजी आणि भारताच्या डावाच्या सुरुवातीला अप्रतिम गोलंदाजी व क्षेत्ररक्षण करत यजमान श्रीलंकेने जवळजवळ आपला विजय निश्चित केला होता. परंतु चाहर आणि भुवनेश्वरच्या नाबाद ८६ धावांच्या भागिदारीने त्यांच्या विजयाच्या अपेक्षांवर पाणी फेरले. श्रीलंकेच्या एकाहून एक सरस गोलंदाजांना भारताच्या या खालच्या फळीतील खेळाडूंना बाद करता आले नाही. परिणामी त्यांना ३ विकेट्सने सामन्यासह वनडे मालिकाही गमवावी लागली.

हे पाहून श्रीलंका संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर अतिशय निराश झाले. त्यांनी सामन्यानंतर चक्क मैदानातच संघ कर्णधार दानुस शनाका याच्यासोबत वाद घातला. सोशल मीडियावर आर्थरच्या या वागणुकीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येते की, आर्थर रागाने शनाकावर ओरडत आहे. यावर शनाका आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आर्थर त्याचे एक ऐकून घेत नाही आणि त्याच्यावर ओरडू लागतो. त्यानंतर शनाका एकीकडे हात करुन काहीतरी सांगतो आणि आर्थर रागाने त्या दिशेने निघून जातो. आर्थर आणि शनाकामधील हा प्रसंग पाहून अगदी समालोचकही त्यावर भाष्य करतात.

https://youtu.be/XORC25q4Ijk

Dasun Shanaka Vs Mickey Arthur Fight🔥🔥 || වලිය මෙන්න🔥

https://twitter.com/pradeep_reports/status/1417555730555576320?s=20

श्रीलंकेचा संघ प्रशिक्षक आर्थरच्या या वर्तवणूकीवर माजी श्रीलंकन क्रिकेटपटू रसेल अरनोल्ड यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यातील संवाद मैदानावर नव्हे खरे तर ड्रेसिंग रूममध्ये व्हायला पाहिजे,’ असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

यावर उत्तर देत आर्थरने लिहिले की, ‘रस (रसेल) आपण एकत्र बरेचसे सामने जिंकलोय आणि पराभूतही झालोय. परंतु त्यातून आपण नेहमी काही ना काही शिकलो आहे. दसुन आणि मी मिळून संघाला पुढे घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यावेळी आम्ही दोघेही पराभवानंतर खूप संतापलो होतो. परंतु आम्ही आमची मर्यादा ओलांडली नाही. खरे तर आमच्यात खूप चांगली डिबेट झाली. त्यामुळे या वादाला वाईट रूप देण्याचा प्रयत्न करू नका.’

भलेही आर्थरने शनाकासोबतच्या आपल्या वादावर स्पष्टीकरण दिले असले तरीही सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या वागणूकीवर निशाणा साधला आहे. काहींनी तर आता या कृत्यानंतर आर्थर जास्त दिवस श्रीलंकेचा प्रशिक्षक राहणार नाही, अशा शब्दांत टिका केली आहे. तर काहींनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे उदाहरण देत आर्थरवर टिका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शाबासकी तर द्यायलाच हवी! कोलंबोत धवनच्या टीम इंडियाने मिळलेल्या विजयाचे सातासमुद्रापारहून विराटकडून कौतुक

इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासले, कर्णधार-उपकर्णधार झाले जखमी

एका टीम इंडियाकडून दुसऱ्या टीम इंडियाला प्रोत्साहन; इंग्लंडमध्ये श्रीलंकेतील विजयाचा आनंद साजरा, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---