टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेची सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याने मोठे भाष्य केले आहे. गंभीरने भारतीय संघासाठी धोकादायक ठरणाऱ्या संघाचे नाव सांगितले आहे. कोणता आहे तो संघ, चला जाणून घेऊया…
कोणता आहे तो संघ?
गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्यानुसार, श्रीलंका संघ (Gautam Gambhir On Sri Lanka Team) आगामी आयसीसी टी20 विश्वचषक 2022मध्ये (ICC T20 World Cup 2022) भारतीय संघासाठी धोका बनू शकतो. स्टार स्पोर्ट्सच्या ‘गेम प्लॅन’ शोमध्ये बोलताना गंभीर म्हणाला की, “श्रीलंका संघाला आशिया चषकात ज्याप्रकारे यश मिळाले, त्यामुळे तो धोकादायक ठरू शकतो. ज्याप्रकारे ते खेळत आहेत, त्यामुळे ते कदाचित योग्य वेळी शिखर गाठत आहेत. तसेच दुष्मंता चमीरा आणि लाहिरू कुमारा यांच्या उपस्थितीमुळे कदाचित त्यांना जास्त फायदा होत आहे. ते धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे टी20 विश्वचषकात ते जास्त आत्मविश्वासासोबत दिसणार आहेत.”
श्रीलंकेचा पहिला सामना 16 ऑक्टोबरला
श्रीलंका संघ सुपर 12मध्ये थेट क्वालिफाय झाला नाहीये. त्यांना पहिल्या फेरीतील सामने खेळावे लागतील. तसेच, त्यात चांगली कामगिरी केल्यानंतरच ते पुढे जाऊ शकतात. पहिल्या फेरीत श्रीलंका अ गटात आहे. त्यात त्यांचा सामना नामीबिया, यूएई आणि नेदरलँड्स यांच्याशी होणार आहे. त्यांचा पहिला सामना 16 ऑक्टोबर रोजी नामीबियाशी होणार आहे.
टी20 विश्वचषकासाठी श्रीलंका संघ
दासुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरिथ असालंका, भानुका राजपक्षे, धनंजय डी सिल्वा, वानिंदु हसरंगा, महीश थीक्षणा, जेफ्री वांडरसे, चमिका करुणारत्ने, दुष्मंता चमीरा, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका, प्रमोद मदुशन
राखीव खेळाडू
अशेन बंडारा, प्रवीण जयविक्रमा, दिनेश चांडीमल, बिनुरा फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो
भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानशी
याव्यतिरिक्त भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं, तर भारत सुपर 12 फेरीत खेळणार आहे. भारताचा टी20 विश्वचषक 2022मधील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जरा इकडं पाहा! पाकिस्तानी पठ्ठ्यासोबत परदेशी चाहतीला करायचंय लग्न, क्रिकेटपटूवर लागलेत गंभीर आरोप
विराट अन् बाबरपेक्षा इंग्लंडचा ‘हा’ फलंदाज भारी, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे हैराण करणारं वक्तव्य