श्रीलंकेने इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी मंगळवारी इयान बेलची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. श्रीलंक क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन ही माहिती देताना सांगितले की, इंग्लंडसाठी 118 कसोटी सामन्यांमध्ये 7727 धावा करणारा महान फलंदाज बेल या आठवड्याच्या अखेरीस संघात सामील होणार आहे. त्यासोबतच इयान बेल त्याच्या स्टायलिश फलंदाजीसाठी ओळखला जात होता. त्याचा अनुभव श्रीलंकेच्या संघाला उपयोगी पडेल.
श्रीलंका क्रिकेटने सांगितले की, इयान बेल 16 ऑगस्टपासून संघासोबत काम करण्यास सुरुवात करेल आणि तीन कसोटी सामन्यांची मालिका संपेपर्यंत तो संघाशी संबंधित राहील. बेलला इंग्लिश क्रिकेटची चांगली जाण असून या मालिकेत त्याची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. तत्तपूर्वी श्रीलंका संघाने भारताला वनडे मालिकेत 2-0 ने पराभव केले आहे. ज्यामुळे संघाचे मनोबल वाढले आहे.
आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिन्ही फॉरमॅटमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इयान बेलने 2004 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. तो अखेरचा सामना 2015 मध्ये इंग्लंडकडून खेळताना दिसला होता. 42 वर्षीय इयान बेलने इंग्लंडकडून 118 कसोटी, 161 एकदिवसीय आणि 8 टी-20 सामने खेळले आहेत. 118 कसोटी सामन्यांमध्ये इयान बेलने 22 शतके (एक द्विशतक) आणि 46 अर्धशतकांसह 7727 धावा केल्या आहेत. त्याने 2011 मध्ये भारताविरुद्ध द्विशतक झळकावले होते. त्याच्या नावावर 161 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5416 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 4 शतके, 35 अर्धशतकांचा समावेश आहे. तर आठ टी20 सामन्यांमध्ये त्याने 115.34 च्या स्ट्राइक रेटने 188 धावा केल्या आहेत. पाच वेळा ॲशेस मालिका जिंकणाऱ्या संघाचा तो सदस्य होता.
श्रीलंकेच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात मँचेस्टर येथे 21 ते 25 ऑगस्ट या कालावधीत पहिली कसोटी, 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत लॉर्ड्स येथे दुसरी कसोटी, तर तिसरी आणि शेवटची कसोटी 6 ते 10 सप्टेंबर दरम्यान ओव्हल येथे खेळवली जाईल.
हेही वाचा-
काैतुकास्पद…!! श्रीजेशसोबत त्याची 16 क्रमांकाची जर्सीही निवृत्त, हॉकी इंडियाची मोठी घोषणा
“पाकिस्तान क्रिकेट संघाला मिळाला गाैतम गंभीर सारखाच हेड कोच”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा मोठा दावा
ठरलं! आयपीएल विजेता केकेआर स्टार्कसह या 5 खेळाडूंना रिटेन करणार