श्रीलंका संघाचा (sri lanka cricket team) प्रमुख फलंदाज भानुका राजपक्षेने काही दिवसांपूर्वी अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आता श्रीलंकेच्या अजून एका खेळाडूने अशाच प्रकारे निवृत्तीची घोषणा केली आहे. या खेळाडूचे नाव आहे धनुष्का गुणतिलका (danushka gunathilaka). गुणतिलकाने फक्त कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि तो एकदिवसीय आणि टी२० मध्ये पुढेही खेळत राहणार आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.
श्रीलंका क्रिकेटने आजच धनुष्का, कुशल मेंडिस आणि निरोशन डिकवेला यांच्यावरील बंदी उठवली होता. बोर्डाने त्यांच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत हा निर्णय घेतला होता. या तिन्ही खेळाडूंनी मागच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर बायो बबलचे उल्लंघन केले होते. इंग्लंडविरुद्धच्या डरहम कसोटीदरम्यान या तिघांना रात्रीच्या वेळी बाहेर फिरताना पाहिले गेले होते. खेळाडूंनी त्यांच्यावरील बंदी उठवण्यासाठी अपील केली होती, त्यानंतर बोर्डने हा निर्णय घेतला आहे.
धनुष्काने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेताना सांगितले की, त्याने हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. त्याने त्याचा शेवटचा कसोटी सामना २०१८ मध्ये क्राइस्टचर्चमध्ये खेळला होता. माध्यमांतील वृत्तानुसार, कसोटी निवृत्तीच्या निर्णयानंतर तो म्हणाला की, “स्वतःच्या देशासाठी खेळणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. भविष्यात माझ्या योग्यतेनुसार जेव्हा कधी माझी गरज असेल, तेव्हा मी श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करत राहील.”
धनुष्काच्या कसोटी कारकिर्दीचा विचार केला, तर ती खूप छोटी आहे आणि त्याने वयाच्या ३० व्या वर्षी कसोटी निवृत्ती घेतली आहे. त्याने आतापर्यंत एकूण आठ कसोटी सामन्यांमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले आहे आणि यामध्ये दोन अर्धशतकांसह २९९ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी १८.६८ होती. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने श्रीलंकेसाठी ४४ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि यामध्ये ३६.१९ च्या सरासरीने १५२० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या १० अर्धशतकांचा समावेश आहे. टी२० मध्ये त्याने ३० सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले आणि ५६८ धावा केल्या. टी२० मध्ये त्याने तीन अर्धशतके ठोकली.
महत्वाच्या बातम्या –
‘लढवय्या’ विहारीबद्दल प्रशिक्षक द्रविडने दिली मने जिंकणारी प्रतिक्रिया; म्हणाला…
“… तेव्हा शार्दुल खूप रागावलेला”; सहकाऱ्याने सांगितली ‘ती’ आठवण
वरिष्ठ आणि खुली राष्ट्रीय रोइंग अजिंक्यपद स्पर्धा: महाराष्ट्राच्या मृण्मयी साळगावकरला ब्राँझपदक
व्हिडिओ पाहा –