fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक घेणाऱ्या श्रीलंकेच्या ‘या’ खेळाडूला झाली अटक

Sri Lanka Cricket Suspends Shehan Madushanka For Alleged Possession Of Drugs

मुंबई । पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात धारदार गोलंदाजी करत हॅट्ट्रिक घेणारा श्रीलंका क्रिकेट संघाचा खेळाडू शेहान मदुशनाका अडचणीत सापडला आहे. हेरोइन बाळगल्या प्रकरणी श्रीलंकन पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संपूर्ण देशभरात टाळेबंदी असताना मदुशनाका जोरात गाडी चालवत होता. त्या वेळेस पोलिसांनी त्याची गाडी अडवल्यानंतर गाडीत आणखी एक व्यक्ती सोबत होता. रविवारी मधुशनाकाला पणाला शहरात अटक करण्यात आल्यावर त्याच्या जवळ दोन ग्रॅम हेरॉइन (अफूच्या आर्कापासून बनवलेले गुंगी आणणारे औषध) आढळून आले.

न्याय दंडाधिका-यांनी २५ वर्षीय खेळाडूला दोन आठवड्यांसाठी कोठडी सुनावली आहे. मदुशनाका जानेवारी २०१८ साली बांगलादेशविरुद्ध खेळताना एकदिवसीय सामन्यात हॅटट्रिक घेतली होती. यंदाच्या वर्षात त्याने आपल्या राष्ट्रीय संघाकडून दोन आंतरराष्ट्रीय टी-20सामने देखील खेळला आहे. दुखापतीमुळे सध्या तो संघाबाहेर आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-सप्टेंबरमध्ये आयपीएल झालीच तर हा एकमेव देश आहे आयोजनसाठी पर्याय

-धोनीवर तोंडसुख घेणाऱ्या युवराज सिंगवर रैनाचा पलटवार; मला संधी दिली कारण…

-‘आयपीएलमधील तो क्षण स्वप्न पूर्ण करणारा होता’

You might also like