fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

धोनीवर तोंडसुख घेणाऱ्या युवराज सिंगवर रैनाचा पलटवार; मला संधी दिली कारण…

Suresh Raina Replied to Yuvraj Singh said yes MS Dhoni Supported Me

नवी दिल्ली । एमएस धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता, तेव्हा सुरेश रैनाचे अकरा जणांच्या संघात असणे साहजिक होते यात कसलीही शंका नाही. अनेकांचे असे मत आहे की धोनीने रैनाला खराब फॉर्म असूनही भारतीय संघात खेळवले होते. ज्यावेळी धोनीने कर्णधारपद सोडले, तेव्हा रैनाला संघातून वगळण्यात आले.

नुकतेच युवराज सिंगने (Yuvraj Singh) वक्तव्य करत म्हटले होते की, रैना (Suresh Raina) धोनीचा आवडता खेळाडू होता. युवराजच्या या वक्तव्यावर आता रैनाने प्रत्युत्तर दिले आहे.

धोनीला माझ्यातील प्रतिभेबद्दल माहित होतं-

फॅनकोडशी बोलताना त्याने म्हटले की, “मी म्हणेल की धोनीने (MS Dhoni) निश्चितच माझे समर्थन केले आहे. कारण त्याला माहिती होतं की माझ्यात प्रतिभा आहे. जेव्हा-जेव्हा त्याने मला पाठिंबा (Support) दिला, त्यावेळी मी त्याच्यासाठी ती कामगिरी करून दाखविली आहे. मग ती चेन्नई सुपर किंग्जकडून (Chennai Super Kings) असो किंवा मग भारतीय संघाकडून.”

मधली फळी खूप कठीण-

तरी रैनाला धोनीकडून चेतावणी मिळत होती. तो पुढे म्हणाला की, “धोनीबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो तुम्हाला २ सामन्यांनंतर सांगणार. त्यानंतर म्हणणार की, जर तू चांगल्या धावा केल्या नाहीत तर मला मोठे पाऊल ऊचलावे लागेल. मी त्याला म्हणालो होतो की, मला केवळ १ किंवा २ सामने दे. मी आश्वासन देतो की, पुन्हा त्याच चुका करणार नाही.”

मधल्या फळीत फलंदाजांसमोर अनेक आव्हाने-

रैनाने यादरम्यान मधल्या फळीतील फलंदाजांसमोर असलेल्या आव्हानाबद्दलही चर्चा केली. त्याचे म्हणणे होते की, मधल्या फळीतील फलंदाजांसमोर खूप आव्हाने असतात. कारण त्यांना जवळपास सर्व क्रिकेट प्रकारात वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये फलंदाजी करावी लागते.

तो म्हणाला की, “तुम्हाला माहिती आहे की, मधळी फळी सोपी नाही. प्रत्येक सामन्यात तुम्हाला खेळावे लागते. अनेकवेळा १०-१५ षटके फलंदाजी करावी लागती. तसेच अनेकवेळा ३० षटकांपर्यंतही करावी लागू शकते. आमची परिस्थिती वेगवेगळी आहे. आम्हाला गोलंदाजीदेखील करावी लागते. तसेच २-३ विकेट्सही घ्यावे लागतात आणि १५-२० धावादेखील वाचवाव्या लागतात. मधली फळी नेहमीच आव्हानात्मक राहिली आहे. परंतु मी नेहमीच प्रत्येक गोष्ट सकारात्मकतेने घेतो.”

रैनाने भारतीय संघाकडून आतापर्यंत १८ कसोटी सामने, २२६ वनडे सामने आणि ७८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ७६८, वनडेत ५६१५ आणि टी२०त १६०५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने कसोटीत १३, वनडेत ३६ आणि टी२०त १३ विकेट्स घेतल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-केवळ ८ वर्षांचा असल्यापासून ‘या’ खेळाडूला सचिन करतोय मार्गदर्शन, आज आहे टीम इंडियाचा स्टार

-‘आयपीएलमधील तो क्षण स्वप्न पूर्ण करणारा होता’

-सील बाॅर्डर क्राॅस करुन भाजप खासदार क्रिकेट खेळण्यासाठी हरियाणात

You might also like