नुकतेच श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात मर्यादित षटकांच्या मालिका पार पडल्या आहेत. पाहुण्या भारताने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-१ असा विजय मिळवला आहे. तर यजमान श्रीलंकाने ३ सामन्यांची टी२० मालिका २-१ ने जिंकली आहे. भारताचा श्रीलंका दौरा संपून २ दिवसही झाले नाहीत तोवर श्रीलंकेच्या ३३ वर्षीय गोलंदाजी अष्टपैलू इसुरु उडाना याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या या तडकाफडकी निर्णयाने सर्वांनाच अचंबित केले आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात माहिती दिली आहे. उडानाने तत्काळ प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपातून निवृत्त होण्याचे ठरवले आहे.
“मी माझ्या राष्ट्रीय कर्तव्यातून मुक्त होण्याची वेळ आली आहे. जेणेकरुन युवा क्रिकेटपटूंना संघात संधी मिळून शकेल. मी उत्कटतेने आणि वचनबद्धतेने माझी जबाबदारी पार पाडली. क्रिकेटद्वारे मला माझ्या देशाची सेवा करता आली याचा मला प्रचंड अभिमान आहे,” असे उडानाने निवृत्तीवेळी म्हटले आहे.
Thank you very much ❤️. Love you all. Stay safe. #goodbye #IZY17 pic.twitter.com/4dXt72bMn0
— Isuru Udana (@IAmIsuru17) July 31, 2021
उडाना भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी श्रीलंका संघाचा भाग होता. परंतु त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. त्याने आपल्या १२ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत श्रीलंकेकडून ३४ टी२० आणि २१ वनडे सामने खेळले आहेत. तसेच त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणत्या २ फिरकीपटूंना खेळवावे? प्रशिक्षक द्रविडने दिले उत्तर
कोहली करणार फायद्याचा सौदा, टीम धवनला सतावणाऱ्या ‘या’ श्रीलंकन क्रिकेटरला देणार आरसीबीत संधी!
‘मिशन इंग्लंड’ फत्ते करण्यासाठी माजी दिग्गजाकडून भारतीय संघाला मिळाला ‘हा’ मोलाचा सल्ला