भारतीय संघ २००७ नंतर इंग्लंडच्या मैदानावर कसोटी मालिका जिंकण्यासाठी हतबल झाला आहे. परंतु यावेळी भारताकडे सुवर्ण संधी आहे. कारण इंग्लंड संघ विशेषतः त्यांची फलंदाजी आणि फिरकी गोलंदाज हे फारसे मजबूत दिसून येत नाहीयत. दुसरीकडे भारतीय संघाकडे लयीत असलेले रिषभ पंत, केएल राहुल, रोहित शर्मा, आर अश्विन असे खेळाडू उपलब्ध आहेत. तरीही भारताचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी भारतीय संघातील उणिवा दाखवत त्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले की, कसोटी मालिकेत इंग्लंड संघाला पराभूत करायचे असेल, तर त्यांना त्यांच्या कमजोर बाजूवर काम करण्याची गरज आहे. इंग्लंडच्या स्थितीत भारतीय संघाची सर्वात मोठी अडचण त्यांची फलंदाजी आहे.
भारतीय संघाच्या या कमजोरीबद्दल स्टार स्पोर्ट्सवर बोलताना व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले की, “जर भारताला इंग्लंडला इंग्लंडच्याच मैदानावर पराभूत करायचे असेल, तर संघाच्या फलंदाजांना एकजुट होऊन उत्कृष्ट फलंदाजी करावी लागणार आहे. भारतीय संघ फक्त एक किंवा दोन फलंदाजांवर अवलंबून राहत असेल तर काहीही होऊ शकत नाही. काही नेमक्या फलंदाजावर निर्भर राहणे ही भारतीय संघाची सर्वात मोठी कमजोरी आहे.”
त्याचबरोबर व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले की, “२०२० मध्ये भारताने ज्याप्रकारे कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. त्यावरून हे स्पष्टपणे दिसून येत आहे की, भारतीय संघात किती खोली आहे. परंतु संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी फलंदाजीवर जास्त लक्ष दिले पाहिजे. तर इंग्लंड संघाला पराभूत करणे सोपे जाईल.”
“परदेशी परिस्थितीमध्ये, विशेषत: इंग्लंडमध्ये भारतीय संघ पूर्णपणे एक किंवा दोन फलंदाजांवर अवलंबून असतो. जर तुम्हाला इंग्लंडला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत हरवायचे असेल; तर तुमच्या फलंदाजांना एकत्र येऊन चांगला खेळ दाखवावा लागेल आणि मोठी धावासंख्या उभी करावी लागणार आहे. संघातील एक किंवा दोन फलंदाजांकडून कामगिरीची अपेक्षा करून भारतीय संघ ही मालिका जिंकू शकणार नाही. रवी शास्त्री आणि विराट कोहली यांना याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे,” असेही त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर या कसोटी मालिकेत भारत आणि इंग्लंडमधून कोणते खेळाडू सर्वात महत्त्वाचे असतील असे विचारण्यात आले होते. याबद्दल बोलताना व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी सांगितले की, भारतासाठी रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह तर इंग्लंडसाठी जो रूट आणि जेम्स अँडरसन हे सर्वात महत्त्वाचे खेळाडू असतील.
महत्त्वाच्या बातम्या-
खुशखबर! कोलंबो टू इंग्लंड, विराटसेनेत सहभागी होण्यासाठी ‘या’ दिवशी उड्डाण भरणार सूर्यकुमार आणि शॉ
कधीकाळी ‘या’ ३ क्रिकेट स्पर्धांचा होता बोलबाला, आजही क्रिकेटप्रेमींचे करू शकतात भरपूर मनोरंजन





