श्रीलंकेमध्ये सध्या आर्थिक चणचण सुरू आहे. त्यातच श्रीलंका क्रिकेट बोर्डने माजी खेळाडूला भलामोठा दंड भरण्याची सूचना दिली आहे. झाले असे की, श्रीलंका क्रिकेट बोर्ड (एसएलसी) आणि संघाचा माजी क्रिकेटपटू अर्जुन रणतुंगा यांच्यातील वाद चिघळला आहे. श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने माजी कर्णधार रणतुंगा यांनी खोटे आणि अपमानजनक वक्यव्य केल्याने त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याच्या निर्णय बोर्डने घेतला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनी अर्जुन रणतुंगा (Arjuna Ranatunga) यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये रणतुंगांना २ अब्ज (दोनशे कोटी श्रीलंकन रूपये) रूपयांचा दंड भरण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डने त्यांच्यावर खोटे आणि अपमानजनक विधाने केल्याचा आरोप लावत दंड भरण्यास सांगितले आहे. रणतुंगा हे श्रीलंकेच्या राष्ट्रीय खेळ परिषदेचे अध्यक्ष आहेत. कार्यकारी समितीने त्यांना लेटर ऑफ डिमांड (LOD) पाठवले आहे.
न्यायालयीन कारवाई करण्याचा निर्णय
एसएलसीने त्यांच्या विधानात म्हटले, एसएलसी कार्यकारी समितीने घेतलेल्या बैठकीत रणतुंगा यांनी खोटे, अपमानजनक आणि विचित्र विधाने केले त्यावर विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. त्यानंतरच त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याचा निर्णय पक्का करण्यात आला. तसेच या विधानात पुढे म्हटले गेले की, रणतुंगा यांनी केलेल्या विधानामुळे एसएलसीची प्रतिमा आणि प्रतिष्ठेला धक्का पोहचून त्याचे नुकसान झाले.
रणतुंंगा यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेची कामगिरी
श्रीलंका क्रिकेट संघाने रणतुंगा यांच्या कर्णधारपदाखाली १९९६मध्ये वनडे विश्वचषक जिंकला होता. ते त्यांच्याकाळातील सर्वोत्कृष्ठ फलंदाज होते. त्यांना श्रीलंकेला परदेशी भुमिवर सामने जिंकण्यास शिकवले. त्यांनी श्रीलंकेकडून ९३ कसोटी सामन्यात ५१०५ धावा आणि १६ विकेट्स घेतल्या. तसेच २६९ वनडे सामन्यात ७४५६ धावा करताना ७९ विकेट्स घेतल्या. त्यांनी या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये प्रत्येकी ४-४ शतके केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दु:खद! बीसीसीआयच्या माजी सदस्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, झारखंडशी होते कनेक्शन
‘खेळूद्या की त्याला’, आशिया चषकापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीचे विराटबद्दल मोठे वक्तव्य
भारताच्या ‘या’ अष्टपैलूची कारकिर्द धोक्यात, पुन्हा दुखापतीमुळे झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर?