श्रीलंकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू थिसारा परेरा हा खेळाडू तब्बल २२ संघाकडून आजपर्यंत क्रिकेट खेळला आहे. श्रीलंकेकडून ६ कसोटी, १६६ वनडे व ८४ टी२० सामने खेळलेल्या परेराने आजपर्यंत २२ संघाकडून क्रिकेट खेळले आहे.
केवळ आयपीएलमध्येच परेरा आजपर्यंत ६ संघांकडून खेळला आहे. त्यात चेन्नई, पंजाब, कोची, मुंबई, पुणे आणि हैद्राबाद संघांचा समावेश आहे.
क्रिकबझ वेबसाईटनुसार तो ३४, तर क्रिकइंफो वेबसाईटवरील प्रोफाईलनुसार तो २२ संघांकडून क्रिकेट खेळला आहे.
त्याने आजपर्यंत श्रीलंका, चेन्नई सुपर किंग्ज, सनझायझर्स हैद्राबाद, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, कोची टस्कर केरळा, मुंबई इंडियन्स, किंग्ज ११ पंजाब, ब्रिसबेन हिट्स, कोल्ट क्रिकेट क्लब, ढाका प्लाटून, ग्लोस्टेशायर, गयाना एँमेझाॅन वाॅरीयर्स, मोंटरेल टायगर्स, मुलतान सुलतान, क्वाॅटा ग्लॅडियेटर्स, श्रीलंका अ, श्रीलंका अंडर १९, सेंट किट्स व नेविस पॅट्रिओट्स, ऑटिंग्वा हाॅकबिल्स, सेंट ल्युसिया, कांदुराता वाॅरियर्स, कोमिला विक्टोरियन्स, बारिसल बुल्स, मेलबर्न रेंजेड्स, श्रीलंका एकादश, रंगापुर रायडर्स, वायंबा इलेव्हन्स, आयसीसी विश्वएकादश ११, कोलंबो, डंबुल्ला, पकाटिया पॅंथर्स, बांगला टायगर्स, उथुरा येल्लोव्ज, आशिया ११ व विश्वएकादश एवढ्या संघाकडून क्रिकेट खेळले आहे.
गमतीचा भाग म्हणजे क्रिकेट जगतावर २४ वर्ष राज्य करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर केवळ ७ तर सध्या रणमशिन म्हणून ओळखला जाणार विराट कोहली केवळ ९ संघांकडून खेळले आहेत.
परेराचे सध्याचे वय ३२ वर्ष आहे. नुकतीच त्याने (३ मे) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. परंतु तो फ्रँचायझी क्रिकेट खेळणार आहे. अशात पुढे तो आणखी किती वेगवेगळ्या संघांकडून क्रिकेट खेळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
आधी नेतृत्त्व काढून घेतलं, मग संघातील स्थानही; डेविड वॉर्नरच्या भावाने SRHला घेतलं फैलावर
‘नटराज मनिष’, एक पाय वर करत पांडेने खेळला आगळा वेगळा शॉट; आल्या भन्नाट प्रतिक्रिया