---Advertisement---

श्रीलंकेचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय; टीम इंडियाच्या दोन धुरंधरांचे टी20 पदार्पण

On: मंगळवार, जानेवारी 3, 2023 6:42 PM
Ind-vs-Sl
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ नवीन वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेपासून करत आहे. 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (दि. 03 जानेवारी) वानखेडे येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी भारत विरुद्ध श्रीलंका संघात नाणेफेक पार पडली. ही नाणेफेक श्रीलंका संघाने जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात दोन्ही संघ विजय मिळवत नवीन वर्षाची विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील.

भारत विरुद्ध श्रीलंका संघातील पहिल्या सामन्यासाठी भारताच्या दोन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण केले आहे. हे खेळाडू इतर कुणी नसून शुबमन गिल (Shubman Gill) आणि शिवम मावी (Shivam Mavi) हे आहेत. विशेष म्हणजे, अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) बरा नसल्यामुळे त्याला भारताच्या ताफ्यात स्थान मिळाले नाहीये.

पहिल्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघ
भारत-
शुबमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, हर्षल पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, युझवेंद्र चहल.

श्रीलंका- पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), धनंजया डी सिल्वा, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दसून शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महीश थीक्षणा, कसून रजिथा, दिलशान मदुशंका

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आईसलँडवाल्यांची एवढी हिम्मत! ‘किंग’ कोहलीचा खुलेआम अपमान
सूर्या श्रीलंकन फलंदाजांची करणार धुलाई! नेट्समध्ये खेळले एकापेक्षा एक शॉट्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---