भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. 27 जुलैपासून टी20 मालिकेला शुभारंभ होत आहे. तर एकदिवसीय मालिका 2 ऑगस्टपासून खेळली जाणार आहे. टी20 सामने पल्लेकेले तर एकदिवसीय सामने कोलंबोमध्ये खेळले जाणार आहेत. तत्पूर्वी श्रीलंकन खेळाडू मथीशा पाथिराना (Matheesha Pathirana) म्हणला की, मी सीएसकेकडून खेळणे ही देवानं दिलेली भेट होती.
मथीशा पाथिराना (Matheesha Pathirana) हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) खेळतो. चेन्नईनं त्याला 2022च्या आयपीएलच्या लिलावामधून करारबद्ध केले होते. आता पाथिरानाची श्रीलंकेच्या मुख्य संघात निवड झाली आहे. त्यावर तो म्हणाला, “मी अंडर-19 स्पर्धा खेळल्यानंतरही श्रीलंकेच्या कोणत्याच संघात नव्हतो. पण सीएसकेसाठी पदार्पण केल्यानंतर माझी श्रीलंकेच्या मुख्य संघात निवड झाली. सीएसके कडून खेळणे ही माझ्यासाठी देवाने दिलेली भेट आहे. माही भाईसोबत ड्रेसिंग रुम शेअर करणे खूप खास आहे.”
पाथिरानानं आयपीएल 2022मध्ये चेन्नईकडून पदार्पण केलं होतं. त्यानं त्याच्या आयपीएल कारकीर्दीमध्ये 20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 34 विकेट्स त्याच्या नावावर केल्या आहेत. सर्व सामने त्यानं सीएसकेकडून खेळले आहेत. तर आयपीएल 2024च्या हंगामात त्यानं चेन्नईकडून 6 सामने खेळले. त्यामध्ये 13 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याचा इकाॅनाॅमी रेट 7.68 राहिला.
महत्त्वाच्या बातम्या-
ज्याला भारताने नाकारले, त्याने इंग्लंड गाजवले..! अजिंक्य रहाणेची 9 चौकारांसह 71 धावांची वादळी खेळी
रोहित- विराट 2027 चा वनडे विश्वचषक खेळू शकतील का? नेहरा म्हणाला ‘हे’ खेळाडू करू शकतात रिप्लेस
महाराष्ट्राच्या अपराजित मुली उपांत्य फेरीत, मुलांच्या संघाचा पराभव; सब ज्युनियर मुली संघाचा पिछाडीवरून विजय