श्रीलंका क्रिकेट संघ आज(24 सप्टेंबर) पाकिस्तान विरुद्ध मर्यादीत षटकांच्या मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानला रवाना झाला आहे. 27 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात श्रीलंका पाकिस्तान विरुद्ध 3 वनडे आणि 3 टी20 सामने खेळणार आहे.
हा दौरा करण्याआधी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये श्रीलंका संघाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला होता. पण श्रीलंकेला सुरक्षेची हमी मिळाल्याने संघ पाकिस्तानला रवाना झाला आहे.
याआधी 2009 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंका संघाच्या बसवर हल्ला झाला होता. त्यावेळी श्रीलंकेचे काही खेळाडू जखमी झाले होते. या घटनेनंतर अनेक संघांनी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान त्यांचे घरचे बहुतांश सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळतात.
पण आता श्रीलंकेनेच पाकिस्तानला जाण्याची तयारी दाखवली आहे. असे असले तरी काही दिवसांपूर्वी श्रीलंकेच्या 10 खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यासाठी नकार दिला होता. त्यामुळे श्रीलंकेने या 10 खेळाडूंचा त्याच्या संघात समावेश केला नाही.
तसेच याआधी 2017 मध्ये श्रीलंका संघ लाहोरला एकमेव टी20 सामना खेळण्यासाठी गेला होता.
पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याआधी श्रीलंकेच्या टी20 संघाचा कर्णधार दसून शनका म्हणाला, ‘मी याआधी तिकडे गेलो आहे. आमच्यासाठी जी सुरक्षा देण्यात आली आहे त्याबद्दल मी समाधानी आहे. पाकिस्तानमध्ये श्रीलंका संघाने नेतृत्व करायला मिळाणार असल्याचा मला आनंद आहे. आम्हाला आशा आहे की आम्ही पाकिस्तान संघाला कडवी झूंज देऊ.’
तसेच श्रीलंकेचा वनडे कर्णधार लहिरु थिरिमन्नेनेही म्हटले आहे की त्यांना उच्च दर्जाची सुरक्षा देण्यात येणार असल्याने कोणतीही चिंता नाही.
Sri Lanka National team left SLC head quarters this morning to embark on their tour to Pakistan.
Sri Lanka will play a three-match ODI series in Karachi and three T20Is in Lahore. #PAKvSL pic.twitter.com/tiaTSxgpNh— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 24, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टीम इंडियाला कसोटी मालिकेआधी मोठा धक्का, हा मोठा खेळाडू झाला संघाबाहेर
–कृणाल पंड्या सांभाळणार या संघाचे कर्णधारपद
–२००७ टी२० विश्वचषकाच्या फायनलचा हिरो सध्या करतो काय?