---Advertisement---

“विजय मिळवणेच श्रीलंका संघ विसरुन गेला आहे”, दिग्गज क्रिकेटरकडून आपल्याच देशाच्या संघाला घरचा आहेर

On: गुरूवार, जुलै 22, 2021 9:08 AM
---Advertisement---

श्रीलंका संघाला गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेत देखील त्यांना पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लावला आहे. मंगळवारी (२० जुलै) पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ३ गडी राखून विजय मिळवला आणि या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.

हा सामना श्रीलंका संघाने जवळपास आपल्या बाजूने वळवला होता, परंतु शेवटच्या क्षणी दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमारच्या भागिदारीमुळे श्रीलंका संघाला हा सामना गमवावा लागला.या पराभवामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला जात आहे. अशातच माजी श्रीलंकन खेळाडूनेही निराशा व्यक्त केली आहे.

दिग्गज श्रीलंकन गोलंदाज मुथय्या मुरलीधरन यांनी इएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मी यापूर्वीच म्हटले आहे की जिंकायचा मार्गच श्रीलंका संघ विसरून गेला आहे. गेल्या काही वर्षांपासून हा संघ विसरूनच गेला आहे की विजय कसा मिळवायचा.”

दुसऱ्या वनडे सामन्यात लेग स्पिनर वनिंदू हसरंगाने ३ गडी बाद करत भारतीय संघाला अडचणीत टाकले होते. परंतु, कर्णधार दसून शनाकाने त्याची काही षटके राखून ठेवली होती, ज्यामुळे शेवटच्या षटकांमध्ये त्याला गोलंदाजी करावी लागली, जे श्रीलंका संघाला भारी पडले, असे मुरलीधरन यांना वाटते.

मुरलीधरन पुढे म्हणाले की, “मी तर यापूर्वी देखील म्हटले होते की श्रीलंका संघाने जर सुरवातीच्या १०-१५ षटकात ३ गडी बाद केले तर, भारतीय संघ अडचणीत येऊ शकतो. परंतु, दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी अप्रतिम फलंदाजी केली. श्रीलंका संघाने काही मोठ्या चुका देखील केल्या होत्या. त्यांनी वनिंदू हसरंगाकडून गोलंदाजी करून घ्यायला हवी होती. त्याची षटकं शेवटच्या षटकांसाठी शिल्लक ठेवायला नको होती. जर श्रीलंका संघाने भुवनेश्वर कुमार किंवा चाहरची विकेट घेतला असता, तर शेवटच्या फलंदाजांना सामना जिंकून देणे कठीण झाले असते. त्यांनी काही चुका केल्या आहेत. परंतु हा एक अननुभवी संघ आहे.”

श्रीलंका संघ पराभूत झाल्यानंतर श्रीलंका संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी देखील संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते. याबाबत बोलताना मुरलीधरन यांनी म्हटले की,”मला असे वाटते की प्रशिक्षक आपली निराशा आणि संताप व्यक्त करत होते. परंतु हे सर्व करण्याऐवजी त्यांनी शांत राहून संघाला मार्गदर्शन करायला हवे होते की, कुठल्या गोलंदाजाकडून गोलंदाजी करून घ्यायला हवी होती.”

महत्त्वाच्या बातम्या – 

कोलंबोतील अविश्वसनीय विजयानंतर भुवनेश्वरने धोनीबरोबर केलेल्या ‘त्या’ भागीदारीच्या आठवणींना दिला उजाळा

रोहित शर्मा पहिल्यांदाच बनणार कसोटी कर्णधार? ‘हे’ आहे कारण

भावा, करुन दाखवलंस! दीपक चाहरचा विजयी चौकार बहिणीने केला कॅमेऱ्यात कैद; काढले गौरवोद्गार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---