---Advertisement---

Video : इंग्लंड-श्रीलंका कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दिसला ‘सरडा’, आयसीसीनेही घेतली दखल

On: सोमवार, जानेवारी 25, 2021 8:15 AM
---Advertisement---

गॉल। क्रिकेट मैदानात अनेकदा वेग-वेगळ्या प्राण्यांना आलेले पाहिले आहे. कधी कुत्रा, कधी मधमाश्या, कधी पक्षी बऱ्याचदा मैदानात हजेरी लावत असतात. पण गॉल येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान चक्क एक मोठा सरडा मैदानात आला होता. याबाबत सोशल मीडियावर विविध आणि गमतीशीर प्रतिक्रिया उमटल्या. अगदी आयसीसीनेही याची दखल घेतली.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२४ जानेवारी) इंग्लंड संघाच्या पहिल्या डावाच्या ६४ व्या षटकादरम्यान हा सरडा (Asian water monitor) कॅमेरामनने आपल्या कॅमेरात टिपला. तो सरडा मैदानात बाऊंड्री लाईनजवळ फिरत होता. त्याला पाहिल्यानंतर स्टेडियमच्या स्टाफने त्याला बाहेर काढले.

दरम्यान, त्याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आयसीसीनेही त्याचा एक फोटो शेअर करत गमतीने लिहिले की ‘आयसीसीला रिपोर्ट मिळाला आहे की श्रीलंका संघ इंग्लंडविरुद्ध ज्यादाचा क्षेत्ररक्षक वापरत आहे. त्यामुळे या परिस्थितीला ‘मॉनिटर'(दखल) केले जाईल.’

याशिवाय एका ट्विटर युझरने लिहिले आहे की ‘एक भीतीदायक सरडा मैदानावर आलाय’, तर एकाने लिहिलंय ‘रुटची खेळी मस्तच होती आणि आता हा सरडाही… काय शानदार सुरुवात आहे सकाळची’

सामन्याबाबत बोलायचे झाल्यास इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेने पहिल्या डावात अँजेलो मॅथ्यूजच्या(११०) शतकी खेळीच्या आणि दिनेश चंडिमल(५२), निरोशान डिकवेल्ला(९२) आणि दिलरुवान परेरा(६२) यांच्या अर्धशतकांमुळे ३८१ धावांचा डोंगर उभारला. या डावात इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात खराब झाली, मात्र कर्णधार जो रुटने दिडशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याने ३०९ चेंडूत १८६ धावा केल्या. त्याला ५५ धावा करत जोस बटलरने चांगली साथ दिली. इंग्लंडने तिसऱ्या दिवसाखेर ९ बाद ३३९ धावा केल्या आहेत. अजूनही ते ४२ धावांनी पिछाडीवर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

माहिमचा ‘शानदार शार्दुल’!

“आता भारतासाठी सलामीला फलंदाजी करण्यासही तयार”, वॉशिंग्टन सुंदरने केले प्रतिपादन

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईच्या संघाची निराशाजनक कामगिरी, निवड समिती अध्यक्षांनी ‘हे’ बदल करण्याची केली मागणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---