लीड्स। आज 2019 विश्वचषकात 44 वा सामना भारत विरुद्ध श्रीलंका संघात होणार आहे. साखळी फेरीतील हा दोन्ही संघाचा शेवटचा सामना आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारताने 11 जणांच्या संघात 2 बदल केले आहेत. आज युजवेंद्र चहलला विश्रांती दिली असून कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे. तसेच मोहम्मद शमी ऐवजी आज रविंद्र जडेजाला संधी मिळाली आहे. जडेजाचा हा या विश्वचषकातील पहिला सामना आहे.
त्याचबरोबर श्रीलंकेने 11 जणांच्या संघात 1 बदल केला आहे. त्यांनी जेफ्री वॅन्डर्सीच्या ऐवजी थिसरा परेराला संधी दिली आहे.
या सामन्यात श्रीलंका विजय मिळवून स्पर्धेचा त्यांचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतील. तर उपांत्य सामना खेळण्याआधी विजय मिळवून विश्वासाने पुढे जाण्याच्या इराद्याने भारतीय संघ आज मैदानात उतरेल.
असे आहेत 11 जणांचे संघ –
भारत – केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), रिषभ पंत, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हर्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
श्रीलंका – दिमुथ करुणरत्ने (कर्णधार), कुसल परेरा (यष्टीरक्षक), अविष्का फर्नांन्डो, कुशल मेंडिस, लाहिरु थिरिमन्ने, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डि सिल्वा, थिसरा परेरा, इशुरु उडाना, कासुन रजिता, लसिथ मलिंगा.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–आज शेवटचा वनडे खेळणाऱ्या इम्रान ताहिरने दिला भावनिक संदेश
–उपांत्य फेरीत प्रवेश करताच न्यूझीलंडने केली या विश्वविक्रमाची बरोबरी
–दोन दिवसांपूर्वीच बेअरस्टोने केलेला विश्वविक्रम आता झाला बाबर आझमच्या नावावर






