---Advertisement---

INDvsSL | अट्टापट्टूच्या वादळी खेळीच्या जोरावर श्रीलंकेचा विजयी शेवट, ७ विकेट्सने जिंकली तिसरी टी२०

On: सोमवार, जून 27, 2022 5:12 PM
Chamari Athapaththu
---Advertisement---

श्रीलंका विरुद्ध भारत महिला संघातील तिसरा व शेवटचा टी२० सामना डंबुला येथे सोमवारी (२७ जून) खेळला गेला. श्रीलंकेची कर्णधार चमिरा अट्टापट्टू हिने झंझावाती खेळी खेळत श्रीलंकेला विजयी शेवट करून दिला. श्रीलंकेने ७ विकेट्सने हा सामना जिंकला. मात्र मालिका भारतीय संघाच्या नावावर झाली असून त्यांनी २-१ ने मालिकेवर आपले नाव कोरले आहे. 

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर १३८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेकडून कर्णधार चमिराने एकाकी झुंज दिली आणि १७ षटकातच संघाला विजय मिळवून दिला.

भारताच्या १३९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून चमिराने कर्णधार खेळी केली. ३७ धावांवर २ विकेट्स अशी स्थिती असताना चमिराने मोर्चा सांभाळला. ४८ चेंडूत नाबाद ८० धावांची वादळी खेळी तिने खेळली. या खेळीदरम्यान तिने १ षटकार आणि १४ चौकारही मारले. अर्थात ६२ धावा तिने केवळ बाउंड्रीनीच जोडल्या. तिच्याव्यतिरिक्त निलाक्षी डी सिल्वा हिनेही ३० धावांच्या खेळीचे योगदान दिले.

या डावात भारतीय गोलंदाजांना प्रभावी प्रदर्शन करता आले नाही. भारतीय संघाकडून ७ वेगवेगळ्या खेळाडूंनी गोलंदाजी केली. तरीही त्यांना फक्त ३ विकेट घेता आल्या. रेणुका सिंग आणि राधा यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. तर दिप्ती शर्माने सिमरन बहादूरच्या मदतीने निलाक्षीला धावबाद केले.

तत्पूर्वी भारतीय संघाकडून एकही फलंदाज अर्धशतक करू शकली नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. तसेच जेमिमाह रोड्रिगेजने ३३ धावांचे योगदान दिले. सलामीवीर स्म्रीती मंधाना आणि सब्बीनेनी मेघना यांनीही प्रत्येकी २२ धावा जोडल्या. याखेरीज खालच्या फळीत पूजा वस्त्राकारने ६ चेंडूत १३ धावांची छोटेखानी खेळी करत संघाला १३८ धावांपर्यंत पोहोचवण्यात हातभार लावला.

या डावात श्रीलंकेकडून सुगंधिका कुमारी, ऍमा कंचना, ओ रणशिंगे, इनोका रणवीरा यांनी प्रत्येकी एका-एका फलंदाजाला तंबूत धाडले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

म्हणून ऋतुराजच्या जागी हुड्डा आला सलामीला, कॅप्टन हार्दिकने स्पष्ट केले कारण

बाबो! भुवनेश्वर कुमारने चक्क २०८ किमी दर ताशी वेगाने टाकला चेंडू, अख्तरचा मोडला वर्ल्डरेकॉर्ड?

पुण्याचा राघव पावडे प्रथम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---