आशिया चषकाच्या (Asia Cup) 15व्या हंगामातील शेवटचा सामना रविवारी (11 सप्टेंबर) पार पडला. या सामन्यात यजमान श्रीलंका संघाने बाजी मारली आहे. या स्पर्धेत त्यांची सुरूवात पराभवाने झाली होती. पहिल्या सामन्यात 105 धावांवर सर्वबाद होणारा संघ अंतिम सामन्यात पोहोचला. कोणी विचार केला होता असे होईल आणि श्रीलंका सहाव्यांदा आशिया चषक उंचावेल, पण तसे झाले आहे. श्रीलंकेने अंतिम लढतीत पाकिस्तानला 23 धावांनी पराभूत करत अशी कामगिरी केली आहे.
आशिया चषक 2022च्या स्पर्धेत श्रीलंकेचा पहिला सामना अफगाणिस्तानशी झाला. हा सामना श्रीलंकेने 8 विकेट्सने गमावला. मात्र या पराभवाने न खचता श्रीलंकेने लागोपाठ चार विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला. या वेळी त्यांनी बांगलादेश, अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तानला पराभूत केले. संघाच्या या विजयीप्रवासामध्ये एकाच खेळाडूचा नाही तर संपूर्ण संघाचे योगदान आहे. तर या स्टार खेळाडूंची कामगिरी आपण पाहुया.
चार फलंदाजांनी केल्या 100पेक्षा अधिक धावा
या आशिया चषकात श्रीलंकेच्या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. सलामीजोडी व्यतिरिक्त मधल्या फळीतील फलंदाजांनीही योग्य साथ दिली आहे. भानुका राजपक्षे (Bhanuka Rajpaksa) याने 6 सामन्यात 191 धावा केल्या आहेत. तो श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
राजपक्षेने पाकिस्तान विरुद्धच्या अंतिम सामन्यात नाबाद 71 धावा केल्या असून ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली आहे. त्याच्याबरोबरच पथुम निसांका यानेही 6 सामन्यांत 155 धावा करत दोन अर्धशतके केली आहेत. सलामीवीर कुसल मेंडीस याच्यासाठी ही स्पर्धा उत्तम राहिली आहे. त्याने 6 सामन्यात 111 धावा केल्या.
स्पर्धेत पाच गोलंदाजांनी घेतल्या 5 पेक्षा अधिक विकेट्स
श्रीलंका संघ अंतिम फेरीत पोहोचला याचे कारण त्यांनी गोलंदाज, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात जबरदस्त प्रदर्शन केले. गोलंदाजीत संघाच्या पाच खेळाडूंनी पाच किंवा पाचपेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. वानिंदू हसरंगा याने 6 सामन्यात 9 विकेट घेत तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
हसरंगाने अंंतिम सामन्यात शेवटच्या षटकात तीन विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला. त्याच्याशिवाय महीश तीक्षणा यानेही पॉवरप्ले दरम्यान फलंदाजाला दबावात आणण्याची कामिगरी केली. त्याने 6 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या. तर प्रमोद मधुशंका याने 2 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या. तर दिलशान मधुशंका (6) आणि चमिका करूणारत्ने (7) यांनी विकेट्स घेतल्या आहेत.
श्रीलंकेचा हा विजय फक्त क्रिकेटसाठीच ऐतिहासिक ठरला असे नाही तो राजकियदृष्ट्याही खूप महत्वाचा आहे. या सामन्यात श्रीलंका एका वेळी 5 विकेट गमावत 58 धावांवर होता. त्यानंतर राजपक्षेने 45 चेंडूत नाबाद 71 धावा करत संघाची धावसंख्या सहा विकेट 170 अशी केली. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. राजपक्षेने त्याच्यासोबत 58 धावांची भागीदारी रचली. हसरंगानेही 21 चेंडूत 36 धावा केल्या. त्यानंतर चमिका करूणारत्ने याने राजपक्षेसोबत 54 धावांची भागीदारी रचली आणि संघाला 160च्या पुढे नेले.
भानुका राजपक्षे याने अंतिम सामन्यात भन्नाट अर्धशतक केल्याने तो सामनावीराचा मानकरी ठरला, तर हसरंगा 6 सामन्यात 9 विकेट आणि 66 धावा करत मालिकावीर ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वयाच्या 19 व्या वर्षी अल्कारझचे घवघवीत यश, यूएस ओपन जिंकत एटीपी क्रमवारीत पोहोचला अव्वलस्थानी
पाकिस्तानला विजय मिळवून देऊ शकला नाही, पण रिजवान ‘या’ बाबतीत विराटवर पडला भारी
श्रीलंकेला विजयाच्या ‘वीरू स्टाईल’ शुभेच्छा; पाकिस्तानलाही मारला टोमणा