---Advertisement---

INDvsSL, 3rd T20I: जखमी इशानच्या जागी सॅमसनची वर्णी, तर ‘या’ ३ गोलंदाजांना विश्रांती; पाहा दोन्ही संघ

On: रविवार, फेब्रुवारी 27, 2022 6:43 PM
Rohit-Sharma-Dasun-Shanaka
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात धरमशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रविवारी (२७ फेब्रुवारी) तिसरा आणि शेवटचा टी२० सामना (Third T20I) रंगणार आहे. हा सामना जिंकत यजमान भारताला मालिका ३-० ने खिशात घालण्याची संधी असेल. तर पाहुणा श्रीलंका क्लिन स्वीपपासून वाचण्यासाठी हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.

तत्पूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता या सामन्यासाठी नाणेफेक झाली आहे. श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका याने नाणेफेक जिंकली असून त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

https://twitter.com/BCCI/status/1497921400647999495?s=20&t=XSwFRd4teDHl6tOm9HbaDg

भारताचा सलामीवीर इशान किशन (Ishan Kishan) या सामन्यात खेळणार नाही. दुसऱ्या टी२० सामन्यादरम्यान त्याच्या डोक्याला चेंडू लागल्यामुळे तो जखमी झाला आहे. याच कारणामुळे तो या सामन्यात अनुपलब्ध असेल. त्याच्या जागी यष्टीरक्षक संजू सॅमसन सलामीला फलंदाजी करताना दिसेल. तसेच जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल या गोलंदाजांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्याजागी रवी बिश्नोई, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांचे संघात पुनरागमन झाले आहे.

तर श्रीलंकेच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही २ बदल करण्यात आले आहेत. प्रविण जयविक्रमा आणि कमिल मिशारा यांना बाहेर करण्यात आले आहे. तर जयित लियानेग आणि जेफरे वेंडरसे यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिली गेली आहे.

https://twitter.com/ICC/status/1497920305972805638?s=20&t=XSwFRd4teDHl6tOm9HbaDg

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आवेश खान

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, दानुष्का गुनाथिलका, चरिथ असालंका, दिनेश चंडिमल (यष्टीरक्षक), जेनिथ लियानागे, दसुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमेरा, जेफ्री वेंडरसे, बिनुरा फर्नांडो, लाहिरू कुमारा

धरमशाला स्टेडियमवर भारतीय संघाची कामगिरी
भारतीय संघाने धरमशाला स्टेडियमवर आतापर्यंत ३ टी२० सामने खेळले आहेत. वर्ष २०१५ मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये या मैदानावर उद्घाटन सामना खेळला गेला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला ७ विकेट्सने मात दिली होती. त्यानंतर दुसरा सामना २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच झाला होता, जो पावसामुळे पूर्ण होऊ शकला नव्हता. तर तिसरा सामना नुकताच श्रीलंकेविरुद्ध झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीलंकेविरुद्ध नाबाद ७४ धावा करणाऱ्या अय्यरचे चाहते बनले गावसकर; जोकोविच, फेडररशी केली तुलना

आयपीएल सुरू होण्यापूर्वी ब्रॉडकास्टर्स खुश, तब्बल ‘एवढ्या’ लाख लोकांनी पाहिला मेगा लिलाव

टीम इंडियाला धक्का! फॉर्ममध्ये असलेला फलंदाज श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी२०तून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---