Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारत वि. श्रीलंका तिसऱ्या टी२०त पाऊस आणणार व्यत्यय? जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी

भारत वि. श्रीलंका तिसऱ्या टी२०त पाऊस आणणार व्यत्यय? जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी

February 27, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Dharamsala-stadium

Photo Courtesy: Twitter/@BCCI


रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्त्वाखालील भारतीय क्रिकेट संघ रविवारी (२७ फेब्रुवारी) श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) होणारा तिसरा आणि शेवटचा टी२० सामना (Third T20I) जिंकत पाहुण्यांना व्हाईटवॉश देण्याच्या इराद्यासह मैदानावर उतरेल. हा सामना धरमशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Himachal Pradesh Cricket Association Stadium, Dharamsala)  संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.

तत्पूर्वी याच मैदानावर दुसरा टी२० सामना खेळताना भारताने श्रीलंकेला ७ विकेट्सने पराभूत करत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे सलग तिसरा टी२० सामनाही जिंकण्यावर रोहित आणि संघाची नजर असेल. परंतु या सामन्यावेळी धरमशालेतील वातावरण कसे असेल?, तेथील खेळपट्टीचे स्वरूप कसे असेल?, याबद्दल जाणून घेऊ. 

हेही वाचा- तिसऱ्या टी२०साठी ‘अशी’ असू शकते भारताची ‘प्लेईंग ११’, इशान किशनऐवजी मयंक अगरवालची होऊ शकते निवड

वेदर डॉट कॉमच्या अहवालानुसार, भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्यादरम्यान हवामान साफ राहण्याची (Weather Update P शक्यता आहे. दिवसाचे उच्चतम तापमान १२ डिग्री राहण्याची अपेक्षा आहे. मात्र रात्रीच्या वेळी तापमानात घसरण होऊन ४ ड्रिगीवर जाईल. हवेचा वेग ८ किलोमीटर प्रति तास राहू शकतो.

आनंदाची बाब म्हणजे, सामन्यादरम्यान पावसाची मात्र कसलीही शक्यता नाही. दिवसाची आर्द्रता ६९ टक्के असेल, जी पुढे रात्री ५३ टक्केंपर्यंत कमी होईल. त्यामुळे चाहते तिसऱ्या आणि रोमांचक टी२० सामन्याचा पुरेपूर आनंद लुटू शकतात.

📸📸#TeamIndia #INDvSL pic.twitter.com/reBzU4tvHV

— BCCI (@BCCI) February 26, 2022

खेळपट्टीचा आढावा (Pitch Report)
धरमशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर फलंदाजांना धावा करण्याची पुरेपूर संधी असेल. कारण या मैदानाची खेळपट्टी फलंदाजीस पोषक आहे. मैदानावर पडणाऱ्या दवांमुळे आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघाला अधिक फायदा होऊ शकतो. यापूर्वी धरमशालाच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारताला १८४ धावांचे आव्हान दिले होते, जे भारतीय संघाने १७.१ षटकातच पूर्ण केले होते.

धरमशाला स्टेडियमवर भारतीय संघाची कामगिरी
भारतीय संघाने धरमशाला स्टेडियमवर आतापर्यंत ३ टी२० सामने खेळले आहेत. वर्ष २०१५ मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये या मैदानावर उद्घाटन सामना खेळला गेला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला ७ विकेट्सने मात दिली होती. त्यानंतर दुसरा सामना २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच झाला होता, जो पावसामुळे पूर्ण होऊ शकला नव्हता. तर तिसरा सामना नुकताच श्रीलंकेविरुद्ध झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

तिसऱ्या टी२०साठी ‘अशी’ असू शकते भारताची ‘प्लेईंग ११’, इशान किशनऐवजी मयंक अगरवालची होऊ शकते निवड

मोठ्या मिशा, खांद्यावर रूमाल, आयपीएलपूर्वी ‘रजनीकांत’ स्टाईलमध्ये दिसला धोनी; व्हिडिओ आहे चर्चेत

विश्वचषकापूर्वी घडली हृदयाचा ठोका चुकवणारी घटना, स्म्रीती मंधाना डोक्याला बाउंसर लागून जखमी


Next Post
Rohit-Sharma

कॉफी घेणार का? हिमाचलच्या थंडीची सामन्यादरम्यान कर्णधार रोहित लुटतोय मजा, पाहा व्हिडिओ

Sanju-Samson

श्रीलंकेविरुद्धची दुसरा टी२० सामना सॅमसनसाठी 'या' कारणामुळे होता खूपच खास

Indian-Women-Team

हरमनप्रीतच्या झुंजार शतकी खेळीमुळे रोमांचक सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर २ धावांनी विजय

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143