श्रीलंकेा महिला क्रिकेट संघ मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तान दौऱ्यावर आहे. यजमान पाकिस्तान महिला संघाने श्रीलंकन संघाचा चांगलाच घाम काढला, पण अखेर श्रीलंकाने रविवारी (५ जून) दौऱ्यातील पहिला विजय मिळाला आणि त्यांनी या मालिकेचा शेवट गोड केला. दौऱ्यातील हा शेवटचा सामना असून श्रीलंका संघाची कर्णधार चमारी अट्टापट्टूने सर्वांचे लक्ष वेधले.
पाकिस्तान आणि श्रीलंका महिला संघात सुरुवातील तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली. पाकिस्तानने या टी-२० मालिकेत श्रीलंकेला ३-० असा क्लीन स्वीप दिला होता. त्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने देखील पाकिस्तानने जिंकले. अशात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना देखील पाकिस्तान जिंकेल, असे अनेकांना वाटलो होते. मात्र, श्रीलंकन कर्णधार चमारी अट्टापट्टू (Chamari Athapaththu) शेवटच्या सामन्यात विजयाचा निर्धार करून मैदानात आली होती.
अट्टापट्टूने या सामन्यात शतक ठोकले आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वात महत्वाचे योगदान दिले. अटापट्टूने ८५ चेंडूत कर्णधारपदाला साजेशा १०१ धावा केल्या. यामध्ये तिच्या १३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. श्रीलंकन संघाने हा सामना तब्बल ९३ धावांच्या फरकाने जिंकला.
अट्टापट्टूचे जबरदस्त सेलिब्रेशन
अट्टापट्टूने स्वतःचे शतक केल्यानंतर ज्या पद्धतीने त्याचा आनंद व्यक्त केला, त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली. व्हिडिओत पाहिले जाऊ शकते की, शतक पूर्ण केल्यानंतर अट्टापट्टू चांगल्या उत्साहात आहे आणि मोठ्याने ओरडत आहे. एवढेच करून ती थांबली नाही. तिने खास अंदाजात हातातील बेट हवेत फेकली. बॅट अंदाजे ४ ते ५ सेकंदासाठी हवेत होती आणि नंतर जमिनीवर पडते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर आल्याचे पाहायला मिळत आहे.
Chamari Athapaththu's sixth ODI 💯 and her first against Pakistan 👏
Some celebration from the 🇱🇰 captain after reaching the milestone 💥
Watch Live ➡️ https://t.co/bOGW4Ouhmh
#⃣ #PAKWvSLW | #BackOurGirls pic.twitter.com/BzMdSKwj5U— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 5, 2022
दरम्यान, उभय संघातील या शेवटच्या सामन्याचा विचार केला. प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट्सच्या नुकसानावर २६० धावा केल्या. त्यांतर पाकिस्तानला श्रीलंका संघाने विजयासाठी दिलेले २६१ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या ४१.४ षटकांमध्ये आणि १६७ धावांवर गुंडाळला गेला. पाकिस्तान दौऱ्यातील श्रीलंका संघाचा हा पहिला आणि शेवटचा विजय ठरला. टी-२० पाठोपाठ एकदिवसीय मालिका देखील पाकिस्तानने जिंकली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो’ ऐतिहासिक कसोटी सामना ड्रॉ करायला निघालेले शास्त्री, फिरकीपटू अश्विनचा मोठा खुलासा
विक्रमवीर ‘राफाʼ..! दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने पटकावले १४वे विक्रमी विजेतेपद
कर्णधारपद सोडल्यानंतर पहिल्याच सामन्यात जो रुटच्या नावावर मोठा विक्रम, ऍलिस्टर कूकलाही पछाडले