---Advertisement---

सिराज जोमात, फॅन्स कोमात! श्रीलंकेची अवस्था पाहून ढसाढसा रडली चाहती, पाहा Photos

On: रविवार, सप्टेंबर 17, 2023 4:56 PM
Mohammed-Siraj-Asia-Cup-2023
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय वेगवान गोलंदाजी फळीचा हुकमी एक्का मोहम्मद सिराज याने गाजवतोय. नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या श्रीलंकन कर्णधार दसून शनाका याचा निर्णय सिराजने सपशेल चुकीचा ठरवला. त्याने श्रीलंकेच्या वरच्या फळीतील फलंदाजांना धडकी भरवत गुडघे टेकायला भाग पाडले. सिराजच्या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकेची वरची फळी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळली. सिराजची गोलंदाजी आणि श्रीलंकेची स्थिती पाहून यजमानांचे चाहतेही रडू लागले. आता यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.

सिराजची भेदक गोलंदाजी
भारतीय वेगवान गोलंदाजी फळीचे शिलेदार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) श्रीलंकेच्या फलंदाजांवर चांगलेच भारी पडले. आधी बुमराहने पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर सलामीवीर कुसल परेरा याला शून्यावरच तंबूत धाडले. त्यानंतर लंकेच्या फलंदाजांनी सिराजपुढे नांग्या टाकल्या. सिराजने पहिले षटक निर्धाव टाकले. त्यानंतर त्याने आपल्या दुसऱ्या आणि डावातील चौथ्या षटकात कहर केला.

सिराजने चौथ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पथुम निसांका (2), तिसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमा (0), चौथ्या चेंडूवर चरिथ असलंका (0) आणि सहाव्या चेंडूवर धनंजय डी सिल्वा (4) यांसारख्या शानदार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी श्रीलंकेने आपल्या 4 षटकात 12 धावांवर 5 विकेट्स गमावल्या होत्या.

विशेष म्हणजे, श्रीलंकेची सहावी आणि सातवी विकेट घेण्याचाही पराक्रम सिराजनेच केला. सिराजने श्रीलंकेच्या डावातील सहावे षटक टाकताना चौथ्या चेंडूवर कर्णधार दसून शनाका (Dasun Shanaka) याला तंबूत धाडले. यावेळी तो 4 चेंडू खेळून शून्यावर बाद झाला.  तसेच, 12व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सिराजने कुसल मेंडिस याला 17 धावांवर त्रिफळाचीत बाद केले. अशाप्रकारे श्रीलंकेने आपल्या 7 विकेट्स या अवघ्या 11.2 षटकात 33 धावांवर गमावल्या.

श्रीलंकन चाहते भावूक
श्रीलंका संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना पाहून चाहत्यांनाही गहिवरून आले. आपल्या संघाची अशी अवस्था पाहून काही महिला चाहत्या रडू लागल्या. त्यांचा यादरम्यानचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यावेळी काही चाहत्यांना श्रीलंकेने ज्याप्रकारे सुरुवात केली त्यावर विश्वासही बसला नाही.

https://twitter.com/SillyMessiKohli/status/1703356770159112309

सिराजचा विक्रम
विशेष म्हणजे, मोहम्मद सिराज याने वनडे डावातील पहिल्या 10 षटकात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला. सिराजने डावाच्या पहिल्या 10 षटकात सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. (Sri Lankan fans cried after mohammed Siraj bowling In IND vs SL Asia Cup 2023 Final)

हेही वाचा-
सिराजकडे पाहून खदाखदा हसले विराट आणि गिल, कारण जाणून तुम्हीही व्हाल लोटपोट
पहिल्याच षटकात बुमराहचा श्रीलंकेला दणका! विस्फोटक सलामीवीर दोन चेंडूत OUT

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---