रायपूरमधील शहीद वीर नारायण आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू असलेल्या ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२१’ स्पर्धेचा अंतिम सामना २१ मार्च २०२१ रोजी पडणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंडिया लीजेंड्स संघाने वेस्ट इंडीज लीजेंड्स संघाला पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर १९ मार्च रोजी पार पडलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्रीलंकन लीजेंड्स संघाने दक्षिण आफ्रिकन लीजेंड्स संघाला पराभूत करत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. तसेच हा सामना झाल्यानंतर तिलकरत्ने दिलशानने इंडिया लीजेंड्स संघाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
श्रीलंकन लीजेंड्स संघाने दक्षिण आफ्रिकन लीजेंड्स संघाला उपांत्य सामन्यात ८ गडी राखून पराभूत केले आणि अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.
हा सामना झाल्यानंतर दिलशान इंडिया लीजेंड्स विरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्याबद्दल म्हणाला होता की “नाणेफेक निश्चितच महत्वाची असणार आहे. आमच्याकडे मजबूत फलंदाजी आहे. यामुळे आम्ही दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी खंबीर आहोत. आम्ही प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहोत. मला आशा आहे की २ दिवसानंतर होणाऱ्या अंतिम सामन्यात देखील आम्ही चांगली कामगिरी करू. इंडिया लीजेंड्स संघ खूपच चांगला खेळत आहे. जर अंतिम सामन्यात आम्ही असाच खेळ सुरू ठेवला तर नक्कीच आम्ही इंडिया लीजेंड्स संघाला पराभूत करू शकतो.”
प्रेक्षकांचे आभार – दिलशान
भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो. त्यामुळे कुठल्याही क्रिकेट सामन्यात भारतीय प्रेक्षक खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. त्यामुळे दिलशाननेही ही स्पर्धा पाहाण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘कॅप्टन’ कोहलीचा मोठेपणा! मालिका विजयानंतर ट्रॉफी सोपवली सुर्यकुमार आणि इशान किशनकडे, पाहा व्हिडिओ
टी२०मध्ये ‘कर्णधार’ कोहलीचीच हवा! विलियम्सन, फिंच, मॉर्गन सर्वांनाच वरचढ ठरत गाठला अव्वल क्रमांक
वनडेपाठोपाठ टी२० मालिकेत टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात; दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या सामन्यात मोठा विजय