टी20 विश्वचषकाचा चाैथा सामना श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार आहे. हा सामना आज (3 जून) रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून सुरुवात होईल. न्यूयाॅर्क च्या नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे खेळले जाणार आहे. या सामन्याआधी श्रीलंकेचा कर्णधार वानिंदू हसरंगाने संघाच्या समस्यांबद्दल बोलला आहे. त्याने तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची तक्रार केली आहे.
खरंतर, दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणार हा सामना जेथे होणार आहे. तेथून श्रीलंकन संघ तब्बल 90 मिनिटांच्या अंतरावर राहत आहे. ज्यामुळे संघास लवकर पोहचण्यासाठी समस्या येत आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधताना वानिंदू हसरंगा यांनी सांगितले की सराव करण्यासठी संघाला 3 तास आधीच मैदानात यावे लागते. आणि त्यात 90 मिनिटांचा प्रवास करायचा यामुळे खेळाडूंना समस्यांना तोंड देणे खूप कठीण होत आहे. न्यूयाॅर्क येथे होणारे हे सामने सकाळी 10.30 वाजता खेळले जाणार आहे. एशिया मधील प्रेषकांना विचार करून सामने सकाळी खेळवण्यात येत आहेत. कारण एशिया मधील चाहते संध्याकाळी सामना पाहू शकतील.
हसरंगा पुढे म्हणाला ‘जर सामना लाईट मध्ये होणार असतील तर आम्ही 10.30 वाजता होणार असेल तर आम्हाला एकच चिंता आहे. आम्हाला खूप लवकर पोहचावे लागणार तर आम्हाला 7.30 वाजता यावे लागले. कारण मैदानापासून लांब राहतो. ज्यामुळे प्रवासातच दीड तास जाते हीच आमची खूप मोठी सम्यस्या आहे.’
स्पर्धेत श्रीलंका चार वेगवेगळ्या ठिकाणी साखळी सामने खेळणार आहे. न्यूयॉर्कमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना केल्यानंतर त्यांचा सामना 8 जून रोजी डॅलासमध्ये बांग्लादेशशी होणार आहे. यानंतर श्रीलंका 12 जून रोजी फ्लोरिडामध्ये नेपाळ विरुद्ध आणि 17 जून रोजी सेंट लुसिया येथे नेदरलँड विरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळेल.
महत्तवाच्या बातम्या-
मोठी बातमी ! भारतीय संघ टी20 वर्ल्डकप खेळत असतानाच दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला रामराम
महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन
बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यानंतर राहुल द्रविडने व्यक्त केली नाराजी, खेळाडूंना दिला महत्त्वाचा सल्ला!