सनथ जयसुर्याच्या मार्गदर्शनाखालील श्रीलंकेने टी20 नंतर एकदिवसीय मालिकेतही वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. बुधवारी
(23 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सने पराभव केला. पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला. त्यामुळे षटके कमी केली गेली आणि सामना 44-44 षटकांचा झाला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 36 षटकांत केवळ 189 धावा करू शकला. प्रत्युत्तरात, कर्णधार चारिथ असलंकाच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेने सामना 34 चेंडू शिल्लक असताना मालिका जिंकली.
190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला अविष्का फर्नांडोच्या रूपाने पहिला धक्का बसला. सलामीच्या त्याला केवळ नऊ धावा करता आल्या. निशान मदुष्काने 44 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 38 धावांची खेळी केली. सदीरा समरविक्रमाने 50 चेंडूत 38 धावा केल्या. झेनिथ लियानागे आणि कर्णधार असालंका यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. लियानागे 34 चेंडूत 24 धावांवर धावबाद झाला. कामिंदू मेंडिस 11 धावा करून नाबाद माघारी परतला. तर चरिथ असलंकाने 62 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफने 2 तर गुडकेश मोती आणि रोस्टन चेसने 1-1 बळी घेतले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला 36 षटकांत सर्व गडी गमावून केवळ 189 धावा करता आल्या. एकेकाळी वेस्ट इंडिजने 58 धावांवर आठ विकेट गमावल्या होत्या. यानंतर शेरफेन रदरफोर्ड आणि मोती यांच्यात शतकी भागीदारी झाली. रदरफोर्डने 82 चेंडूत 80 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 4 षटकार मारले. तर मोती 61 चेंडूत 50 धावा करून नाबाद परतला. श्रीलंकेकडून हसरंगाने 4, फर्नांडो आणि टेकशानाने प्रत्येकी 3 गडी बाद केले.
🇱🇰🔥 Sri Lanka conquer the West Indies by 5 wickets in the 2nd ODI to take an unassailable 2-0 series lead! 💪 #SLvWI
What a performance by the boys! Let’s hear your cheers in the comments below! 👇 pic.twitter.com/EwgSv42j6c
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 23, 2024
श्रीलंकेने टी20 मालिका 2-1 ने जिंकली होते. तर आता एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेने 5 विकेटने जिंकला होता. पावसामुळे पहिल्या सामन्यावरही परिणाम झाला. तर या दुसऱ्या सामन्यात देखील श्रीलंकेने कॅरेबियन संघावर 5 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान तिसरा एकदिवसीय सामना शनिवारी होणार आहे.
हेही वाचा-
मोहम्मद शमीचं पुनरागमन लांबणीवर? ‘ब्रेट ली’नं या युवा गोलंदाजाला BGT खेळण्याचा दिला सल्ला
पुण्याच्या एमसीएवर किंग कोहलीची विराट कामगिरी, पाहा आकडेवारी
IND vs NZ; दुसऱ्या कसोटीत गंभीरच्या प्लॅनपुढे न्यूझीलंड ठरणार फेल?