---Advertisement---

क्रिकेटमधील नवा ‘जयसूर्या’ चमकला, ‘या’ स्टार क्रिकेटरचा रेकॉर्ड मोडून रचला इतिहास!

On: शनिवार, जून 28, 2025 3:41 PM
---Advertisement---

Sri Lankan Prabath Jayasuriya Record In Test: श्रीलंकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांग्लादेशचा (SL vs BAN, 2nd Test) 1 डाव आणि 78 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात प्रभात जयसूर्याने दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या. कसोटीतला जयसूर्याचा हा 12वा 5 विकेट हॉल ठरला आहे. विशेष म्हणजे, प्रभात जयसूर्याने यामध्ये श्रीलंकेचा माजी दिग्गज गोलंदाज चमिंडा वासचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. (Prabath Jayasuriya 5 wicket hauls)

प्रभात जयसूर्याने केवळ 41 डावांमध्ये 12 वेळा 5 विकेट हॉल मिळवले आहेत. तर चमिंडा वासने आपल्या संपूर्ण करिअरमध्ये 194 डावात 12 वेळा 5 विकेट्स घेतल्या होत्या. म्हणजेच, जयसूर्याने वासपेक्षा खूप कमी डावांमध्ये ही कामगिरी केली. जयसूर्याच्या नावावर आता 22 कसोटीत 12 वेळा 5 विकेट हॉलचा रेकॉर्ड आहे.

कसोटीत श्रीलंकेसाठी सर्वाधिक 5 विकेट हॉल घेणारे गोलंदाज (Most 5 wicket hauls for Sri Lanka)

मुथैया मुरलीधरन – 67 (228 डाव)

रंगना हेराथ – 34 (170 डाव)

प्रभात जयसूर्या – 12* (41 डाव)

चमिंडा वास – 12 (194 डाव)

दिलरुवान परेरा – 8

सामन्याबद्दल सांगायचं झालं, तर श्रीलंकेने पहिल्या डावात 458 धावा केल्या. त्यानंतर बांग्लादेशने पहिल्या डावात 247 आणि दुसऱ्या डावात फक्त 133 धावा केल्या. या विजयासह श्रीलंकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 असा विजय मिळवला आहे. पहिला कसोटी सामना बरोबरीत सुटला होता. (SL vs BAN Test series result)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---