क्रिकेट खेळणाऱ्या कोणत्याही खेळाडूला त्याच्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न असते. काहींना ही संधी मिळते, तर काहींना मिळत नाही. तसेच काहींना जरी ही संधी मिळाली, तरी फार काळ आपले स्थान देशाच्या राष्ट्रीय संघात टिकवता येत नाही. काही खेळाडू असेही असतात ते क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवल्यानंतर पुढील आयुष्यात वेगळेच क्षेत्र निवडतात. यात आता श्रीलंकेचा क्रिकेटपटू सुरज रणदीव या खेळाडूचाही समावेश झाला आहे. रणदीव चक्क ऑस्ट्रेलियामध्ये ड्रायव्हरची नोकरी सध्या करत आहे.
रणदीवसह श्रीलंकेचा चिंथका जयसिंघे आणि झिम्बाब्वेचा वॅडिंग्टन मायेंगा हे देखील ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतरित झाले असून मेलबर्नमध्ये फ्रेंच कंपनीसाठी बस चालक म्हणून काम करत आहेत. या कंपनीत १२०० ड्रायव्हर काम करतात.
रणदीव हा सध्या बस ड्रायव्हर म्हणून काम करण्याबरोबरच स्थानिक क्रिकेट देखील खेळतो.
साल २०११ च्या विश्वचषकात खेळला आहे रणदीव
रणदीव हा २०११ सालच्या विश्वचषकाच्या श्रीलंका संघात होता. त्याने श्रीलंकेकडून भारताविरुद्ध विश्वचषकाचा अंतिम सामना देखील खेळला होता. अंतिम सामन्यात गोलंदाजी करताना ४३ धावा दिल्या होत्या. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२ कसोटी, ३१ वनडे आणि ७ टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ४३ विकेट्स, वनडेत ३६ विकेट्स आणि टी२०मध्ये त्याने ७ विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच चिंथकाने ५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. तर मायेंगाने १ कसोटी आणि ३ वनडे सामने खेळले आहेत.
https://www.instagram.com/p/5MQy8UhOH1/
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान ऑस्ट्रेलियन फलंदाजांना दिला सराव
रणदीवने नुकत्याही काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान ऑस्ट्रेलियन फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करत सराव दिला होता. त्याचा सराव देतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.
सेहवागला ठेवले होते शतकापासून दूर
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग ऑगस्ट २०१० साली डम्बुला येथे श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात तो ९९ धावांवर नाबाद राहिला होता. त्यावेळी हा सामना थोडा वादग्रस्त ठरला होता.
झाले असे की श्रीलंकेने भारताला १७१ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करत असताना भारताला १ धावांची गरज होती आणि सेहवाग ९९ धावांवर खेळत होता. तसेच जवळजवळ १४ षटके बाकी होती. त्यावेळी सुरज रणदीवने पुढचा चेंडू नो बॉल टाकला. सेहवागनेही षटकार खेचला. मात्र नो बॉल असल्याने भारत तर जिंकला मात्र सेहवागचे शतक हुकले. याबद्दल सेहवाग प्रचंड चिडला. त्याने रणदीववर मुद्दाम नो बॉल टाकला असल्याचा आरोप केला होता. पुढे रणदीवला दिलशानने नो बॉल टाकायला सांगितलं असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर आयसीसीकडून कारवाई देखील केली गेली होती.
याबद्दल काही वर्षांपूर्वी सेहवागने ट्विटही केले होते.
6yrs ago on this day,Hewa Kaluhalamullage Suraj Randiv Kaluhalamulla did this,was hit fr a 6,but I remained 99notout pic.twitter.com/iwhOFdtQNL
— Virender Sehwag (@virendersehwag) August 16, 2016
चेन्नई सुपर किंग्ससाठी दिले योगदान
सुरद रणदीव इंडियन प्रीमीयर लीगमध्ये आयपीएल चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळला आहे. त्याने २०११ साली चेन्नईकडून खेळताना ८ सामन्यात ६ विकेट्स घेतल्या होत्या. या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्सने दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद जिंकले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेआधी ‘हा’ खेळाडू होऊ शकतो टीम इंडियातून बाहेर, कारण घ्या जाणून
टीम इंडियाची ‘माफीया गँग’! मयंक अगरवालने शेअर केलेला ‘हा’ फोटो होतोय व्हायरल
‘असा’ घालवला लॉकडाऊनचा काळ, पिझ्झा, बर्गरवर मारला ताव, केएल राहुलने केला खुलासा