रविवारी (१४ नोव्हेंबर) खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ८ विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने त्यांचे टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील पहिले जेतेपद जिंकले आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करतातना १७३ धावांचे लक्ष्य उभे केले होते आणि ऑस्ट्रेलियाने ते १८.५ षटकात आणि दोन विकेट्सच्या नुकसानावर सामन्यात विजय मिळवला. सलामीवीर डेविड वॉर्नर (५३) आणि मिशेल मार्श (७७) यांचे आणि संघातील इतर खेळाडूंचे या विजयात महत्वाचे योगदान राहिले. त्याव्यतिरिक्त भारताचे दोन माजी खेळाडू आहेत, ज्यांनी या विजयात ऑस्ट्रेलिया संघाला मदत केली आहे.
भारतीय संघाचे माजी फिरकी गोलंदाज श्रीधरन श्रीराम सध्या ऑस्ट्रेलियन संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग आहेत. सध्या ते ऑस्ट्रेलिया संघाेच फिरकी सल्लागार आणि सहाय्यक प्रशिक्षक आहेत. त्यांना सुरुवातीला एका फिरकी सल्लागाराच्या रुपात संघासोबत सामील केले गेले होते. त्यानंतर काही कालावधीनंतर त्यांना संघाच्या महत्वाच्या सदस्यांमध्ये सामील केले गेले. टी-२० विश्वचषकादरम्यान ते ऑस्ट्रेलिया संघासोबत होते आणि दुबईच्या संथ गतीच्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी संघातील फलंदाजांना मार्गदर्शन करत राहीले. त्यांनी ८ एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच आयपीएलमध्येही सहभाग घेतलेला आहे.
त्यांच्याव्यतिरिक्त हरियाणासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळलेले फिरकी गोलंदाज प्रदीप साहू यांनीही ऑस्ट्रेलिया संघाचे मार्गदर्शन केले आहे. २०१९ मध्ये भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत प्रदिप साहू यांना ऑस्ट्रेलियच्या सहाय्यक प्रशिक्षकाच्या रूपात निवडले गेले होते. त्यानंतर त्यांना २०१९ विश्वचषकातही ऑस्ट्रेलियाचा सहाय्यक प्रशिक्षक केले गेले होते.
त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाला फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर खेळण्याचे प्रशिक्षण दिले आहे. सध्या ते ऑस्ट्रेलिया संघासोबत नाहीयेत, पण त्यांनी संघाच्या फलंदाजांनी फिरकी गोलंदाजीवर कसे खेळायचे, हे चांगल्या प्रकारे शिकवलेले आहे. या दोन भारतीयांनी दिलेल्या प्रशिक्षणाचा नक्कीच टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाला फायदा झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा कुटणारा फलंदाजच ठरतोय संघांसाठी बॅडलक! जाणून घ्या, कसं ते?
टी२० विश्वचषकात फ्लॉप झालेल्या कोहलीने फिंचकडून शिकाव्यात ‘या’ गोष्टी, ज्याचा भारताला होईल फायदा!
चँपियन ऑस्ट्रेलियाला चाहत्यांकडून ‘गार्ड ऑफ हॉनर’, बँड बाजाच्या आवाजाने चढवली रंगत; व्हिडिओ व्हायरल