आयपीएल २०२१ चा ५६ वा सामना शुक्रवारी (८ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (आरसीबी) रोमांचक विजय मिळवला. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर आरसीबीचा फलंदाज श्रीकर भरतने जबरदस्त षटकार मारला आणि संघाला विजय मिळवून दिला. आरसीबीने सामन्यात ७ विकेट्स राखुन विजय मिळवला. भरतने केलेल्या कामगिरीसाठी त्याचे सर्वत्र कौतुक केले गेले.
सामन्यानंतर भरत आणि विराट यांच्यात ड्रेसिंग रूममध्ये चर्चा झाली. ही चर्चा भरतच्या शेवटच्या चेंडूवरील विजयी षटकाराबाबत होती. त्यांच्यातील या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओत दिसते की, चर्चेदरम्यान भरत विराटला म्हणाला, “मी वाट पाहत होतो.” त्यानंतर विराट म्हणतो, “फुल टॉस चेंडूची का?” त्यावर भरत पुढे म्हणतो की, “मी चेंडू मिडऑफच्या वरून मारण्यासाठी संधीची वाट पाहत होतो.” भरतच्या या उत्तरानंतर विराट म्हणाला, “गोलंदाजाच्या हातातून चेंडू स्लिप झाला होता, जर चेंडू सामान्य वेगाने आला असता तर असे होऊ शकत होते. तू ज्याप्रकारे चेंडू मारला होता, त्याला पाहून वाटत होते की, तो लांब जाणार.” कर्णधार आणि संघातील शिलेदारामध्ये झालेला हा संवाद चाहत्यांच्या पसंतीस उतरतो आहे.
https://twitter.com/RCBTweets/status/1446679310148853761?s=20
दरम्यान सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसानावर १६४ धावा केल्या होत्या आणि आरसीबीला विजयासाठी १६५ धावांची आवश्यकता होती. आरसीबीच्या फलंदाजीवेळी कर्णधार विराट आणि देवदत्त पडिक्कल स्वस्तात बाद झाले होते आणि आरसीबीचा डाव सावरण्याची जबाबदारी भरत आणि ग्लेन मॅक्सवेलवर आली होती. मॅक्सवेल आणि भरतने ती जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडली आणि संंघाला विजय मिळवून दिला आहे. भरतने ५२ चेंडूंमध्ये ७८ धावांची नाबाद खेळी केली. तसेच मॅक्सवेलनेही ३३ चेंडूत ५१ धावा केल्या.
सामन्यात विजय मिळाला असला तरीही आरसीबीच्या गुणतालीकेतील स्थानात काही बदल झालेला नाही. आरसीबीने हंगामातील १४ पैकी ९ सामने जिंकले आहेत आणि १८ गुणांसह संघ गुणतालीकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्सने १४ पैकी १० सामने जिंकले आहेत आणि संघ गुणतालिकेत २० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. या दोन्हीही संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.
मह्त्वाच्या बातम्या-
चेन्नई वि. दिल्ली संघांचे हेड टू हेड रिकॉर्ड, बघा पहिल्या क्वालिफायरमध्ये कोणाचं पारडं दिसतंय जड?
पहिल्या क्वालिफायरमध्ये गुरू-शिष्य बनणार ‘विक्रमवीर’, धोनी करणार अनोखा विक्रम तर रिषभ रचणार इतिहास
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत ‘या’ दोन खेळाडूंचे भवितव्य मेंटॉर धोनीच्या हातात; कोण आहेत ते धुरंधर?