---Advertisement---

अफगाणिस्तान टी20 विश्वचषकातून ‘आऊट’! सोप्या विजयाने श्रीलंका गुणतालिकेत इंग्लंडच्याही पुढे

On: मंगळवार, नोव्हेंबर 1, 2022 1:09 PM
Sri Lanka
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पुरूषांच्या आठव्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup)मंगळवारी (1नोव्हेंबर) अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सुपर 12चा 32वा सामना खेळला गेला. ब्रिसबेनच्या गाबा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंकेकडून लक्ष्याचा पाठलाग करताना धनंजया डी सिल्व्हा याने नाबाद अर्धशतकी खेळी केली. यामुळे हा सामना श्रीलंकेने 6 विकेट्स आणि 9 चेंडू शिल्लक राखत जिंकला, तर अफगाणिस्तानचे उपांत्य फेरीतील आव्हान संपुष्टात आले. यामुळे ते जवळजवळ स्पर्धेतून बाहेरच पडले आहेत.

या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुरूबाज (28) आणि उस्मान घनी (27) यांनी उत्तम सुरूवात करून दिली. मात्र दोघेही काही अंतराने बाद झाले. तसेच हे दोघेच अफगाणिस्तानकडून या सामन्यात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू ठरले. यावेळी त्यांच्यावर वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याचा कहर बरसला. त्याने 4 षटकात 13 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर लाहिरू कुमारा याने 2 आणि रजिता-धनंजया डी सिल्व्हा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या. यामुळे अफगाणिस्तान 20 षटकात 8 विकेट्स गमावत 144 धावसंख्या उभारू शकला.

लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका 10 धावा करत बाद झाला. तर फॉर्ममध्ये असलेला कुशल मेंडिस हा पण 25 धावा करत बाद झाला त्यामुळे श्रीलंका संघ जरा अडचणीतच आला होता. तेवढ्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला धनंजया डी सिल्व्हा आला त्याने 42 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या. यामुळे श्रीलंकेने 18.3 षटकातच आव्हानाचा यशस्वीरित्या पाठलाग पूर्ण केला.

https://twitter.com/OfficialSLC/status/1587345490353754112?s=20&t=KblHkef5Pi65q3Ut9pEbOA

या सामन्यात अफगाणिस्तानची फलंदाजी, गोलंदाजी बरोबरच मोहम्मद नबी यांचे नेतृत्वही गंडले. त्याच्याकडून गोलंदाजीबाबत काही निर्णय चुकले. राशिद खान कडून ज्या कामगिरीची अपेक्षा होती तसे झाले नाही. त्याने 4 षटकात 31 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याने चरिथ असालंका आणि मेंडिस यांना बाद केले.

हसरंगा त्याच्या उत्तम गोलंदाजीने  सामनावीर ठरला. या विजयामुळे श्रीलंका सुपर 12च्या पहिल्या ग्रुपच्या गुणतालिकेत 4 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आला. तर इंग्लंडचा संघ 3 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या स्पर्धेत श्रीलंकेचा एक सामना बाकी असून उपांत्य फेरीच्या आशा आहेत. ते या स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना 5 नोव्हेंबरला इंग्लंड विरुद्ध सिडनी येथे खेळणार आहेत.

अफगाणिस्तानसाठी हे विश्वचषक निराशाजनकच ठरले, एकतर त्यांचे दोन सामने पावसामुळे रद्द झाले, तर 2 सामने त्यांनी गमावले. त्यांचा शेवटचा सामना यजमान संघाविरोधात 4 नोव्हेंबरला आहे, जो त्यांच्यासाठी केवळ एक औपचारिक सामनाच असणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित-विराट पुढचा टी20 विश्वचषक खेळणार? या प्रश्नावर भडकले टीम सिलेक्टर; म्हणाले, ‘तुम्ही असे…’
‘धिक्कार! तो व्यक्ती सापडला पाहिजे’, विराटच्या बेडरूम व्हिडिओवर भडकला ऋतिक, पत्नी अनुष्का म्हणाली…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---