टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेदरम्यान विराट कोहली याच्या गोपनीयतेचे उल्लंघन झाले. त्याच्या हॉटेलमधील खोलीमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला. या व्हिडिओत विराटच्या खोलीत ठेवलेले कपडे, बूट, इस्त्री, आणि इतर बऱ्याच गोष्टी दिसत आहेत. हा व्हिडिओ विराटने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केला आहे. यावर चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत प्रत्येकजण संताप व्यक्त करत आहेत. चला तर पाहूया विराटच्या या पोस्टवरील सेलिब्रिटींच्या कमेंट्स.
विराटची इंस्टाग्राम पोस्ट (Virat Kohli Instagram Post)
विराट कोहली (Virat Kohli) याने व्हिडिओ लीक होण्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याने लिहिले होते की, “मला समजते की, चाहते त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंना पाहिल्यानंतर किंवा भेटल्यानंतर उत्साहित होतात. या गोष्टीचे मी नेहमीच कौतुक केले आहे. मात्र, हा व्हिडिओ भीतीदायक आहे आणि त्यामुळे माझ्या गोपनीयतेबद्दल मला घाबरवले आहे. माझ्या हॉटेलच्या खोलीत गोपनीयता मिळत नसताना मला वैयक्तिक जागेची अपेक्षा कुठे करू? माझ्या गोपनीयतेमध्ये अशाप्रकारे घुसखोरी केल्याने मी अजिबात ठीक नाहीये. कृपया लोकांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि त्यांना मनोरंजन म्हणून वागवू नका.”
https://www.instagram.com/reel/CkXVWI6g7Ff/?utm_source=ig_web_copy_link
विराटच्या या व्हिडिओवर क्रिकेटपटू आणि बॉलिवूड कलाकारांच्या प्रतिक्रिया
विराटच्या या व्हिडिओवर क्रिकेटपटूंपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत सर्वांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता ऋतिक रोशन याने कमेंट करत लिहिले आहे की, “धिक्कार! तो व्यक्ती सापडला पाहिजे, आणि त्याची हाकालपट्टी केली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी हॉटेलने घेतली पाहिजे.”

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेविड वॉर्नर कमेंट करत म्हणाला की, “हा मूर्खपणा आहे. अस्वीकारार्ह. ते हॉटेल क्राऊनपर्थ होते का?” याव्यतिरिक्त सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट आलिम हकीम यानेही म्हटले की, “हे ज्या व्यक्तीने केले आहे, ते खूपच दु:खद आणि अव्यावसायिक आहे. हे खूपच चुकीचे आहे. पूर्णपणे अनैतिक कृती.”

अभिनेता वरुण धवनही म्हणाला की, “भयानक वर्तन.” अभिनेत्री उर्वशी रौतेला हिनेही कमेंट केली की, “हे सर्वात घाणेरडे आहे. हे निर्लज्ज कृत्य आहे. एखाद्या मुलीच्या बाबतीत असेच काही घडले असते तर?”

विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ पोस्ट करत राग व्यक्त केला आहे. ती म्हणालीये की, “भूतकाळात अशा काही घटना घडल्या, ज्यात चाहत्यांनी सहानुभूती दाखवली नाही, परंतु हे खरोखरच खूप वाईट आहे. हे पूर्णपणे निंदनीय आणि उल्लंघन करणारे आहे. जो कोणी हे पाहतो आणि विचार करतो की, जर सेलिब्रिटी असेल तर सामना करावा लागेल, तर हे समजले पाहिजे की, आपण देखील या समस्येचा एक भाग आहोत. प्रत्येकाने स्वतःवर नियंत्रण ठेवून काम केले पाहिजे. विचार करा की, जर तुमच्या बेडरूममध्येही हे घडत असेल, तर मग मर्यादा कुठे आहे?”
याव्यतिरिक्त एका चाहत्याने ट्वीट करत लिहिले की, “हे पुन्हा झाले नाही पाहिजे. त्याच्या गोपनीयतेचा सन्मान करा. तो सेलिब्रिटी आहे, पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही त्याच्या खासगी गोष्टींमध्ये दखल द्याल. संघ व्यवस्थापनाकडून हे अत्यंत घृणास्पद आहे.”
This should not be happen again. Give some personal space to him, he is celebrity but it doesn't means you break his privacy. This is absolutely disgusting from team management. #ViratKohli pic.twitter.com/5JBZFlsWuQ
— Mohali to Melbourne 82* (@MelbourneNT82) October 31, 2022
विराट कोहलीबाबत घडलेल्या या घटनेने देशातील सेलिब्रिटींसोबतच परदेशातील क्रिकेटपटू आणि चाहतेही आपला संताप व्यक्त करत आहेत. या घटनेसाठी हॉटेलकडून माफीही मागण्यात आली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बूम बूम बुमराहचा पत्ता कट! टी20 विश्वचषकानंतर आता ‘या’ चार मालिकांनाही मुकणार
हार्दिक पंड्या पुन्हा बनला भारताचा कर्णधार, स्वतः बीसीसीआयने सोपवलीये जबाबदारी






