---Advertisement---

श्रीलंकेने आव्हान राखलं! दणदणीत विजयासह मुख्य फेरीच्या आशा कायम

---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू झालेल्या टी20 विश्वचषकाच्या तिसऱ्या दिवशी दुसरा सामना श्रीलंका विरुद्ध युएई (SLvUAE) असा झाला. पहिल्या सामन्यात दोन्ही संघांना पराभव पत्करावा लागलेला. या सामन्यात श्रीलंकेने आशियाई विजेत्यांसारखा खेळ दाखवत युएईला 79 धावांनी पराभूत करत स्पर्धेतील आव्हान कायम राखले. सलामीवीर पथुम निसंका व सर्व गोलंदाजांच्या शानदार कामगिरीने श्रीलंकेने हा विजय साकार झाला.

 

अ गटातील हा चौथा सामना जिलॉंग येथे खेळला गेला. युएईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पथुम निसंका व कुसल मेंडिस यांनी शानदार फलंदाजी करत 42 धावांची सलामी दिली. मेंडिस बाद झाल्यानंतर आलेल्या धनंजय डी सिल्वासह निसंकाने आणखी 50 धावा जोडल्या. पंधराव्या षटकात युएईचा फिरकीपटू कार्तिक मयप्पन याने हॅट्रिक घेत श्रीलंकेच्या डावाची घसरगुंडी घडवली. ही चालू विश्वचषकातील पहिली हॅट्रिक ठरली. त्याच्या गोलंदाजीमुळे श्रीलंकेचा डाव 152 धावांवर मर्यादित राहिला.

या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या युएईचा डाव श्रीलंकेच्या गोलंदाजांनी स्थिरावू दिला नाही. युएईचा एकही फलंदाज 20 धावा करु शकला नाही. श्रीलंकेसाठी वनिंदू हसरंगा व दुष्मंता चमिरा यांनी प्रत्येकी तीन तर महिश तिक्षणाने दोन बळी मिळवले. युएईचा डाव केवळ 73 धावांवर संपुष्टात आला.

अ गटातील समीकरणे या सामन्यानंतर गुंतागुंतीची झाली आहेत. युएई संघाने दोन्ही सामने गमावल्यानंतर त्यांना स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. नेदरलँड्सने आपले दोन्ही सामने जिंकलेत. श्रीलंका व नामिबिया हे प्रत्येकी एका विजयासह दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी विराजमान आहेत. या गटातील अखेरचे दोन सामने श्रीलंका विरुद्ध नेदरलँड्स आणि युएई विरूद्ध नामिबिया होतील. गटातील अव्वल दोन संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुलगा क्रिकेटर, तर सुन जगप्रसिद्ध स्पोर्ट्स होस्ट, असा आहे बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांचा परिवार
बीसीसीआयचे अध्यक्ष झालेले रॉजर बिन्नी पाचवेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटर! गांगुलीसह ‘या’ तिघांनी भुषविलंय पद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---