ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पुरूषांच्या आठव्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) मंगळवारी (1नोव्हेंबर) अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सुपर 12चा 32 वा सामना खेळला गेला. ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंकेकडून लक्ष्याचा पाठलाग करताना धनंजय डी सिल्वा याने नाबाद अर्धशतकी खेळी केली. यामुळे हा सामना श्रीलंकेने 6 गडी आणि 9 चेंडू शिल्लक राखत जिंकला. मात्र, या सामन्यासाठी मैदानात उतरताच श्रीलंकेच्या संघाने टी20 विश्वचषकात एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
ब्रिस्बेनच्या मैदानावर या सामन्यासाठी उतरताना श्रीलंका संघ टी20 विश्वचषकात 50 सामने खेळणारा पहिला संघ बनला. श्रीलंकेने 2007 ते 2022 अशा आठही विश्वचषकात सहभाग नोंदवत ही कामगिरी केली. यापैकी 2021 व 2022 या दोन विश्वचषकावेळी त्यांना पात्रता फेरीचे सामने खेळण्याची देखील संधी मिळाली होती. श्रीलंकेने टी20 विश्वचषकातील आपला पहिला सामना 2007 मध्ये केनियाविरुद्ध खेळला होता. श्रीलंकेने त्या सामन्यात तब्बल 172 धावांनी विजय मिळवत विश्वविक्रम रचला होता. हा विक्रम अद्यापही कायम आहे. त्यानंतर आता 50 व्या सामन्यातही त्यांनी अफगाणिस्तानला 5 गड्यांनी पराभूत केले. श्रीलंका संघाने 2014 मध्ये टी20 विश्वचषक उंचावला होता. तर, 2009 व 2012 विश्वचषकात त्यांनी अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केलेला.
या सामन्याचा विचार करायचा झाल्यास, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुरूबाज (28) आणि उस्मान घनी (27) यांनी उत्तम सुरूवात करून दिली. मात्र दोघेही काही अंतराने बाद झाले. इतर फलंदाजांना अपयश आल्याने अफगाणिस्तान 20 षटकात 8 गडी गमावत 144 धावसंख्या उभारू शकला. श्रीलंकेसाठी वनिंदू हसरंगाने सर्वाधिक तीन बळी मिळवले. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने खराब सुरुवातीनंतरही धनंजय डी सिल्वाच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 18.3 षटकात सामना जिंकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भर दो झोली मेरी! टीम इंडियात निवड न झाल्याने पृथ्वी थेट साईबाबांच्या चरणी
बूम बूम बुमराहचा पत्ता कट! टी20 विश्वचषकानंतर आता ‘या’ चार मालिकांनाही मुकणार