इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना संपल्यानंतर १७ ऑक्टोबर पासून टी२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये पार पडेल. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करत आहेत. तसेच, श्रीलंका संघ देखील ही स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्यांनी आपली नवीन जर्सी लॉन्च केली आहे. ज्याचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
श्रीलंका संघाने २०१४ मध्ये झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, भारतीय संघाला पराभूत करते जेतेपदाला गवसणी घातली होती. परंतु, आगामी विश्वचषक स्पर्धेत या संघाला पात्रता फेरीतील सामने जिंकून सुपर १२ मध्ये प्रवेश मिळणार आहे. तत्पूर्वी, श्रीलंका क्रिकेटने सोमवारी (१० ऑक्टोबर) या स्पर्धेसाठी नवीन जर्सी लॉन्च केली आहे. ज्याची छायाचित्रे श्रीलंका क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
श्रीलंका क्रिकेटने शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये कर्णधार दसुन शनाका जर्सी घालून दिसून येत आहे. या जर्सीबद्दल बोलायचं झालं तर, ही जर्सी निळ्या आणि पिवळ्या रंगाची आहे. ज्यावर उजव्या बाजूला क्रोधित सिंहाचे चित्र आहे. तर आणखी एक जर्सी आकाशी रंगाची आहे. ही जर्सी चाहत्यांचा पसंतीस ठरत आहे. तसेच चाहते देखील या छायाचित्रावर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे.
श्रीलंका संघाचा पात्रता फेरीतील पहिला सामना १८ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. श्रीलंका संघाचा सामना नामिबिया संघासोबत होणार आहे. या स्पर्धेसाठी श्रीलंका क्रिकेटने काही दिवसांपूर्वी १५ सदस्यीय खेळाडूंची घोषणा केली होती.
असा आहे टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकेचा संघ
दसून शनाका (कर्णधार), कुसल परेरा, दिनेश चंदिमल, धनंजय डी सिल्वा, पथुम निसांका, चरित असलांका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, चमिका करुणारत्ने, वानिन्दु हसरंगा, दुष्मंथा चमीरा, लहिरु कुमारा, महेश थीक्षाना, अकिला धनंजय, बिनुरा फर्नांडो.
Sri Lanka skipper Dasun Shanaka in #T20WorldCup jersey! 😍
How do you rate the two? pic.twitter.com/HRqGrSG2un
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 11, 2021
या दिवशी होणार भारतीय संघाची जर्सी लॉन्च
बीसीसीआय देखील येत्या १३ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाची नवीन जर्सी लॉन्च करणार आहे.भारतीय संघाचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.