येत्या जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. हे सर्व सामने श्रीलंकाची राजधानी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होतील. यापूर्वी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे या दौऱ्याच्या रूपरेषेबाबत एक मागणी केली आहे.
श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने ३ टी-२० सामन्याच्या मालिकेत वाढ करून ५ टी-२० सामने खेळवा, अशी मागणी बीसीसीआयकडे केली आहे. तसेच श्रीलंकन क्रिकेट बोर्ड याबाबतीत बीसीसीआयसोबत चर्चा देखील करत आहे. नियोजनाप्रमाणे या मालिकेत ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत.
वनडे आणि टी२० मालिकेचे आयोजन
भारताच्या श्रीलंका दौर्यात सर्वप्रथम वनडे मालिका खेळवली जाणार आहे. १३ जुलै रोजी वनडे मालिकेतील पहिला सामना खेळवला जाईल. त्यानंतर १६ आणि १९ जुलै रोजी वनडे मालिकेचे उर्वरित दोन सामने खेळवले जातील.
वनडे मालिका संपल्यानंतर टी२० मालिकेची सुरुवात होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना २२ जुलै रोजी खेळवला जाईल. तर उर्वरित दोन सामने अनुक्रमे २४ आणि २७ जुलै रोजी खेळवले जातील. अशाप्रकारे तीन वनडे सामने आणि तीन टी२० सामने खेळवण्यात येण्याचे बीसीसीआयचे नियोजन आहे. परंतु श्रीलंका बोर्डाच्या मागणीनंतर जर टी२० मालिकेत वाढ करण्यात आली तर हा दौरा वाढू शकतो.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ जाणार श्रीलंकेत
ठरलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ श्रीलंकेत दाखल होईल. ५ जुलैला भारतीय संघ श्रीलंकेत दाखल होईल तर २८ जुलैला परतीचा प्रवास करेल. परंतु जर ३ ऐवजी टी२० मालिकेत ५ सामने खेळवण्यात आले तर भारतीय संघाला अजून काही दिवस श्रीलंकेत थांबावे लागू शकते.
असा असू शकतो श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघ
पृथ्वी शॉ, शिखर धवन, देवदत पडिक्कल, सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन, मनीष पांडे, ऋतुराज गायकवाड़, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, राहुल तेवतिया, शिवम दुबे, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, हर्षल पटेल, खलील अहमद, जयदेव उनादकट, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि राहुल चाहर.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय महिला क्रिकेटरसोबत झाला होता वाद, आता त्याच संघाचे बनलेत ‘महागुरु’; जाणून घ्या त्यांच्याविषयी