आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकेकाळी दबदबा असलेल्या श्रीलंकेची सध्या अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे. सततच्या पराभवामुळे श्रीलंका संघ दिवसेंदिवस क्रमवारी आणि कामगिरीत घसरताना दिसतोय. सध्या इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेत दुसरा पराभव होताच श्रीलंका संघाच्या नावे एक नकोसा विक्रम जमा झाला. श्रीलंकेच्या नावे आता वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक पराभव जमा झाले आहेत. (srilanka face most defeat in odi cricket)
श्रीलंकेने गमावली मालिका
इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुरूवारी (१ जुलै) ओव्हलच्या मैदानावर पार पडला. सॅम करन व डेव्हिड विलीच्या गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने श्रीलंकेचा डाव २४१ धावांवर रोखला. सलामीवीर जेसन रॉय, अनुभवी जो रूट व कर्णधार ओएन मॉर्गन यांनी अर्धशतके झळकावत संघाला आठ गड्यांनी आरामशीर विजय मिळवून दिला.
श्रीलंकेचे झाले इतके पराभव
इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी श्रीलंका संघाने १९७५ पासून ८५८ सामन्यांमध्ये ३९० विजय व ४२६ पराभव नोंदवले होते. मात्र, इंग्लंड विरुद्ध सलग दोन वनडे सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांच्या नावे आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये सर्वाधिक पराभव जमा झाले. त्यांनी भारतीय संघाला मागे टाकत, हा नकोसा पराक्रम आपल्या नावे केला. भारतीय संघाचे वनडे क्रिकेटमध्ये ४२७ पराभव पत्करले असून, तिसर्या स्थानी असलेल्या पाकिस्तानने ४१४ पराभव पाहिले आहेत.
श्रीलंका संघाचा मोठा इतिहास
श्रीलंकेचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बड्या संघांपैकी एक मानला जात असत. १९७५ मध्ये पहिला वनडे सामना खेळणाऱ्या श्रीलंकेने अवघ्या २१ वर्षात १९९६ मध्ये विश्वचषक उंचावला होता. त्यानंतर, २००७ व २०११ वनडे विश्वचषकाची अंतिम फेरी देखील त्यांनी गाठली होती. अर्जुन रणतुंगा, अरविंद डिसिल्वा, सनथ जयसूर्या, चमिंडा वास, माहेला जयवर्धने, कुमार संगकारा, मुथय्या मुरलीधरन व लसिथ मलिंगा या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने विशेष ओळख बनवली आहे.
महत्वाच्या बातम्या-
सानियाचे ‘ग्रँड कमबॅक’! विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत मिळवला विजय, मुलाने वाढविला उत्साह
जेव्हा वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघाला जगातील सर्वात कमजोर संघाने दाखवला होता चांगलाच इंगा
“मी अशा खेळाडूंच्या कानशिलात लगावली असती,” विश्वविजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया