वनडे विश्वचषक 2023 श्रीलंका क्रिकेट संघाची कामगिरी आतापर्यंत तितकी प्रभावी झालेली नाही. श्रीलंकेला त्यांनी खेळलेल्या तीनही सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. असे असले तरी त्यांच्या संघाने संघर्ष केलेला दिसून येतो. अशात श्रीलंकेच्या गोलंदाजीची धुरा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका याने आपल्या खांद्यावर घेतल्याचे दिसून येते. त्याने या तीनही सामन्यात सर्व प्रसिद्ध फलंदाजांना बाद करण्यात यश मिळवले आहे.
Madushanka in World Cup 2023:
Bavuma in the first over.
Imam in the second over.
Babar in the fourth over.
Warner in the first over.
Smith in the first over.– One of the best bowler in the tournament. pic.twitter.com/M81rjTGaem
— Johns. (@CricCrazyJohns) October 16, 2023
या विश्वचषकात श्रीलंकेचा प्रमुख वेगवान गोलंदाज दुश्मंता चमिरा हा दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नाही. मात्र त्याच्या जागी संधी मिळालेल्या मदुशंका याने तीनही सामन्यात प्रभावी गोलंदाजी करून दाखवली. दक्षिण आफ्रिके विरुद्ध श्रीलंकेच्या गोलंदाजांनी 427 धावा दिल्या होत्या. त्यावेळी त्याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा याला बाद केलेले. पाकिस्तान विरुद्ध त्याने अनुभवी सलामी वीर इमाम उल हक व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांना तंबूचा रस्ता दाखवलेला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यात त्याने सुरुवातीपासूनच आपला प्रभाव पाडला. केवळ 210 धावांचा बचाव करत असताना त्याने आपले पहिले षटक निर्धाव टाकले होते. त्याने आपल्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नर आणि अखेरच्या चेंडूवर स्टीव स्मिथ याला बाद करताना विकेट मेडन षटक टाकले. त्यानंतर त्याने आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये आल्यावर श्रीलंका संघासाठी त्रासदायक ठरत असलेल्या मार्नस लॅब्युशेन याला देखील बाद करण्यात यश मिळवले.
(Srilanka Pacer Dilshan Madushanka Become Giant Killer In ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाचे जोरदार कमबॅक! शतकी सलामीनंतर श्रीलंकेचा अवघ्या 209 धावांत उडाला खुर्दा
कॅप्टन असावा तर असा! पाकिस्तानच्या डावाला रोहितच्या ‘त्या’ निर्णयामुळे लागला सुरूंग, कुलदीपने केला खुलासा