ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात श्रीलंकेची कामगिरी संमिश्र राहिली आहे. पात्रता फेरीच्या पहिल्य सामन्यात पराभूत झाल्यानंतरही श्रीलंकेने पुढील दोन सामने जिंकत सुपर 12 फेरीत मजल मारली. पहिल्या सामन्यात आयर्लंडला नमवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. संघाच्या या कामगिरी सोबतच प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीमुळे श्रीलंकेच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला.
आशिया चषक स्पर्धा जिंकल्यानंतर श्रीलंका संघाकडून विश्वचषकात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पात्रता फेरीच्या पहिल्य सामन्यात नामिबियाने त्यांना पराभूत केलेले. मात्र, पुढील दोन सामने जिंकत त्यांनी मुख्य फेरीत जागा बनवली. परंतु त्याचवेळी प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींनी त्यांना त्रस्त केले आहे. मुख्य फेरी सुरू होण्याआधी संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज दुष्मंता चमिरा दुखापतग्रस्त होत स्पर्धेबाहेर झाला. तर, अनुभवी फलंदाज धनुष्का गुणतिलका याला देखील दुर्दैवाने स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. नजीकच्या काळात उत्कृष्ट कामगिरी केलेला वेगवान गोलंदाज प्रमोद मधुशान हा देखील विश्वचषकातून बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे.
https://twitter.com/OfficialSLC/status/1585220649307734017
मुख्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आपले पहिले षटक टाकतानाच डावखुरा वेगवान गोलंदाज बिनुरा फर्नांडो जायबंदी झाला. एकाच वेळी इतक्या खेळाडूंच्या दुखापतीने संघ अडचणीत असताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने तीन खेळाडूंसह एका सपोर्ट स्टाफ सदस्याला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा निर्णय घेतला.
डावखुरा अनुभवी फलंदाज निरोशन डिकवेला, युवा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो व मथिशा पथिराना हे ऑस्ट्रेलियात लवकरच दाखल होतील. त्यासोबतच श्रीलंका हाय परफॉर्मन्स सेंटरचे प्रमुख टीम मॅककास्किल हे देखील संघाशी जोडले जातील. गरज पडल्यास या खेळाडूंचा मुख्य संघात समावेश केला जाऊ शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इतिहास कायम राहिला! विश्वचषकात आयर्लंडविरुद्ध इंग्लंड नेहमीच होते टाय-टाय फिस्स
टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानाकडे विराटची आगेकूच, सूर्या-बाबरला मागे टाकत नवा खेळाडू दुसऱ्या क्रमांकावर






