---Advertisement---

टी२० क्रिकेटमध्ये श्रीलंकेची दुर्दशा! आकडेवारी पाहून तुम्हीही असेच म्हणाल

On: सोमवार, जुलै 26, 2021 4:32 PM
---Advertisement---

सध्या श्रीलंका क्रिकेट संघाची कामगिरी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली होत नाही. भारताविरुद्ध वनडे मालिकेत संघाचा १-२ असा पराभव झाला. यानंतर टी२० मालिकेतही संघ ०-१ ने मागे पडला आहे. टी२० मालिकेचा दुसरा सामना मंगळवारी (२७ जुलै) रोजी खेळला जाईल. भारताविरूद्धच्या मालिकेपूर्वी श्रीलंका संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर गेला होता. तेथेही त्यांना वनडे आणि टी२० मालिकेत दारूण पराभव पत्करावा लागलेला.

टी२० क्रिकेटमध्ये दयनीय अवस्था
मागील १५ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या संघाच्या कामगिरीवर नजर टाकली तर, ११ सामन्यात संघाला १५० धावांचा टप्पा गाठता आला नाही. या आकडेवारीवरून हे दिसून येते की, संघाची कामगिरी किती खाली आली आहे. श्रीलंकेचा संघ २०१४ टी२० विश्वचषकाचा विजेता ठरला होता.

इतकेच नव्हेतर, अखेरच्या १५ टी२० सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात विजय संपादन करण्यात आला आहे. त्यापैकी १३ मध्ये त्यांना पराभव पत्करावे लागले. तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. संघाचा एकमेव विजय वेस्ट इंडिजविरूद्ध आला होता.

फलंदाजांची नामुष्कीजनक कामगिरी
जानेवारी २०२० पासून फलंदाजांची कामगिरी पाहता श्रीलंकेच्या कोणत्याही फलंदाजाला टी२० मध्ये २०० धावांचा टप्पा गाठाता आला नाही. यामुळे संघाची कामगिरीही खाली आली आहे. कुसल परेराने ८ सामन्यात २५ च्या सरासरीने सर्वाधिक १७६ धावा केल्या आहेत. याकाळात श्रीलंकेच्या केवळ पाच फलंदाजांना अर्धशतकाची वेस ओलांडता आली आहे.

क्रमवारीत सोसावे लागतेय नुकसान
आयसीसीच्या सध्याच्या टी२० क्रमवारीबद्दल बोलायचे झाल्यास श्रीलंकेचा संघ ९ व्या स्थानी असून, अफगाणिस्तानचा नवखा संघ त्यांच्यापेक्षा वरचढ म्हणजे ७ व्या क्रमांकावर आहे. इतकेच नव्हेतर अफगाणिस्तानच्या संघाने टी२० विश्वचषकाच्या सुपर-१२ साठी पात्रता मिळविली आहे.

दुसरीकडे, श्रीलंकेच्या संघाला पात्रता फेरीत खेळावे लागेल. ते आयर्लंड, नामिबिया आणि नेदरलँड्स या गटात आहेत. गटातील अव्वल-२ संघ सुपर-१२ मध्ये जाईल. टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या काळात ओमान व संयुक्त अरब अमिराती येथे खेळला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

जीवाभावाची मैत्री! फुटबॉल खेळताना दिसले रणवीर अन् माही, एकमेकांची गळाभेट घेत केली मस्ती

पाकिस्तानबरोबर पाच नव्हे, तर चारच टी२० सामने खेळणार वेस्ट इंडिज, ‘या’ कारणामुळे बदलले टाईमटेबल

मूर्ती लहान, पण कीर्ती महान! वयाच्या १३ व्या वर्षी ‘या’ मुलींनी टोकियो ऑलिंपिक्समध्ये रचला इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---