---Advertisement---

‘सॉलिड’ समरविक्रमाने झोडली पाकिस्तानची गोलंदाजी, फक्त इतक्या चेंडूवर ठोकले शतक

---Advertisement---

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील 8वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा युवा फलंदाज सदिरा समरविक्रमा याने अप्रतिम शतक ठोकले. विशेष म्हणजे हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक ठरले. 

या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी लंकेकडून सलामीला पथुम निसांका आणि कुसल परेरा उतरले होते. मात्र, डावाच्या दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर हसन अली याने परेराला बाद केले. त्यानंतर कुसल मेंडिस व पथुम निसंका यांनी दुसऱ्या गड्यासाठी 102 धावांची भागीदारी केली. निसंका अर्धशतक करून बाद झाल्यावर चौथ्या क्रमांकावर सदिरा समरविक्रमा हा फलंदाजीला आला.

कुसल मेंडीस एका बाजूने आक्रमण करत असताना त्याने सुरुवातीला सांभाळून खेळ केला. मात्र, जम बसल्यावर त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण करण्यासाठी केवळ 82 चेंडूंचा सामना केला. यामध्ये 10 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. शतकानंतर मात्र तो फार काळ संघर्ष करू शकला नाही. बाद होण्यापूर्वी त्याने 89 चेंडूंमध्ये 108 धावा केल्या. त्याला हसन अली याने बाद केले.

(Srilanka Youngster Sadeera Samarwickrama Hits Maiden ODI Century Against Pakistan)

हेही वाचा-
जाळ अन् धूर संगटच! मेंडिसने लंकेकडून पाकिस्तानविरुद्ध ठोकले वर्ल्डकपमधील वेगवान शतक, फक्त…
टोप्ली पुढे बांगलादेशची टॉप ऑर्डर गुडघ्यावर! तीनच षटकात केली वाताहात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---