आयपीएलचा पंधरावा सिझन धूमधडाक्यात सुरू आहे. मेगा ऑक्शननंतर साऱ्याच टीम एकदम तयार दिसतायेत. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या नव्या संघांच्या येण्याने स्पर्धेतील चुरस आणखी वाढलीय. पहिल्या तीन आठवड्यात तरी फक्त भारतीय युवा खेळाडूंचा दबदबा दिसून आलाय. लियम लिविंगस्टन, ट्रेंट बोल्ट, जोस बटलर हे विदेशी प्लेयर राडा करतायेत.
असे असले तरी भारताचा सख्खा शेजारी असलेल्या श्रीलंकेच्या काही खेळाडूंनी देखील आपली दखल घेण्यास सर्वांना भाग पाडले. भानुका राजपक्षे, दुश्मंता चमीरा, वानिंदु हसरंगा, महिश तिक्षिणा चमकलेत, तर चमीका करुणारत्नेला अद्याप संधी मिळाली नाही. हे पाच श्रीलंकन क्रिकेटर्स यावर्षी आयपीएलमध्ये विविध संघांचे प्रतिनिधित्व करत असले तरी. एक काळ असा होता ज्यामध्ये श्रीलंकन खेळाडूंना चांगली मागणी असायची. आज इंग्लंड, वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएलमध्ये दबदबा असला तरी. आयपीएल मोठी करण्यात श्रीलंकेच्या दिग्गजांचाही तितकाच मोठा वाटा राहिलाय, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच श्रीलंकन दिग्गजांबाबत जाणून घेणार आहोत. ज्यांनी आयपीएलमध्ये आपली अमिट छाप सोडली.
हेही पाहा- आयपीएलमध्ये नादखुळा कामगिरी करणारे श्रीलंकेचे सिंह
लसिथ मलिंगा… जेव्हा केव्हा आयपीएलचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा तो इतिहास लसिथ मलिंगा या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. मुंबई इंडियन्स ही आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम. या टीमला हे पद मिळवून देण्यात मलिंगाचा सिंहाचा वाटा राहिला. मलिंगागा संपूर्ण कारकिर्दीत केवळ मुंबई इंडियन्स संघासाठीच खेळला. श्रीलंकेने जिंकलेल्या एकमेव टी२० वर्ल्डकप विजेत्या संघाचा तो कर्णधार होता. २००८ ते २०१७ पर्यंत तो सलगपणे मुंबईसाठी खेळत आला. त्यानंतर एक वर्ष त्यांनी संघाला मार्गदर्शन केले. पण पुढच्याच वर्षी पुन्हा खेळाडू म्हणून येत फायनलची फायनल ओव्हर शानदार पद्धतीने टाकत त्याने मुंबईला चौथ्यांदा चॅम्पियन बनवलेले. तो पंधरावा सिझन सुरू होण्यापूर्वी आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर होता. त्याचा हा विक्रम ड्वेन ब्रावोने मोडला. मुंबईच्या चार जेतेपदांचा साक्षीदार असलेल्या लंकन लिजेंड मलिंगाचे आयपीएलमधील स्थान ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहील.
कुमार संगकारा… आयपीएल २०२२ मध्ये मलिंगा सोबत कुमार संगकारा राजस्थान रॉयल्सला धडे देताना दिसतोय. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपली दैदीप्यमान कारकीर्द घडवणाऱ्या संगकाराने आयपीएलमध्येही तितकीच दमदार कामगिरी केली. पहिले तीन सिझन तो किंग्स इलेव्हन पंजाबचा भाग राहिला. त्यापैकी दोन सिझनला त्याच्या डोक्यावर कर्णधारपदाचा मुकुट होता. २०११ पासून तो डेक्कन चार्जर्ससाठी खेळू लागला. डेक्कन चार्जर्स ऐवजी ज्यावेळी सनरायझर्स हैदराबादचे आगमन झाले तेव्हादेखील सनरायझर्सचा पहिला कॅप्टन होण्याचा मान संगकाराला मिळाला. आयपीएलचे सहा सीझन खेळला तरी आयपीएल ट्रॉफी उंचावण्याचे भाग्य संगकाराला लाभले नाही.
मलिंगा आणि संगकारा यांच्यानंतर आयपीएलमध्ये ज्याने आपली छाप पाडली तो म्हणजे माहेला जयवर्धने. आधी खेळाडू नंतर कॅप्टन आणि आता कोच म्हणून जयवर्धने आयपीएल गाजवतोय. संगकाराप्रमाणे त्याचे आयपीएल करियर पंजाबसोबत सुरू झाले. तीन वर्षानंतर तो दिल्ली डेअरडेविल्सचा कॅप्टन बनला. खेळाडू आणि कॅप्टन म्हणून त्याने आपली कामगिरी चोख बजावली, पण त्याला खरा मान मिळाला तो कोच म्हणून. २०१७ ला मुंबई इंडियन्सने चला हेड कोच म्हणून पाचारण केले. तेव्हापासून तो आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कोच बनला. अवघ्या सहा वर्षात त्याने मुंबईला चार वेळा ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडलीये.
मलिंगा आणि जयवर्धने यांच्याप्रमाणेच मुंबई इंडियन्सशी खास नाते असणारा आणखी एक श्रीलंकन लीजेंड म्हणजे सनथ जयसूर्या. जयसूर्या आयपीएलचे केवळ तीन सीझन खेळला. तिन्ही सीझनमध्ये त्याची कामगिरी दमदारच राहिली. आयपीएलमध्ये पहिले शतक ठोकणारा श्रीलंकनही जयसूर्याच. २०११ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून रिटायर झाल्याने जयसुर्या पुन्हा आयपीएलमध्ये दिसलाच नाही.
आयपीएल गाजवणाऱ्या श्रीलंकन दिग्गजांची यादी ज्या एका नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ते नाव म्हणजे मुथय्या मुरलीधरन. केवळ आकडेवारीचा विचार केला तर क्रिकेटविश्वातील आजवरचा सर्वोत्कृष्ट स्पिनर असलेल्या मुरलीधरनने आयपीएलमध्येही आपला दबदबा राखला. सुरुवातीची तीन वर्षे तो चेन्नई सुपर किंग्स संघात होता. या तीन वर्षात तो चेन्नईचा सर्वात यशस्वी बॉलर ठरला. पुढे एक वर्ष कोची टस्कर्स केरला आणि त्यानंतर तीन वर्ष रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी खेळून त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटला रामराम ठोकला. आता मागील आठ वर्षापासून तो सनरायझर्स हैदराबादचा मेंटर म्हणून काम करतोय.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आज विराट नसता, तर ‘तो’ नक्कीच असता, वाचा सीएसकेच्या यशाच्या अनसंग हीरोबद्दल
धोनीने धावांचा पाऊस पाडणाऱ्या हेडनला ‘ती’ बॅट वापरण्यास केलेला विरोध, काय होती त्या बॅटची खासियत?
चीयरलीडरच्या ‘त्या’ आरोपामुळे आयपीएलची अब्रू चव्हाट्यावर आली