श्रीलंका संघाचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा याच्यावर आयसीसीचा कोड ऑफ कंडक्ट तोडल्यामुळे मोठी कारवाई केली गेली आहे. त्याच्यावर सामन्यात मिळणाऱ्या मानधनाच्या 50 टक्के दंड ठोठावला आहे. अफगणिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.
वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) हा आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्ट अंतर्गत अनुच्छेद 2.8 चे उल्लंघन केल्या प्रकरणी दोषी आढळला. या अनुच्छेदात कोणत्याही सामन्यात पंचांच्या निर्णयाविरुद्ध आवाज उठवणे याचा समावेश होतो. जर एखादा खेळाडू असे वर्तन करताना आढळला, तर त्याच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते. सामन्याचे रेफरी रंजन मदगुले यांनी लावलेले आरोप हसरंगाने मान्य केले आणि त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज पडली नाही. सामन्यातील मानधनाच्या 50 टक्के दंडाबरोबरच हसरंगाला एक डिमेरीट पॉईंट देेखील देण्यात आला.
नजीबुल्लाह झादरान याला बाद न दिल्याने नाराज होता हसरंगा
ही घटना अफगणिस्तान विरुद्ध श्रीलंका या सामन्यामधील होती. अफगणिस्तान संघ फलंदाजी करत असताना 26व्या षटकात हसरंगाच्या चेंडूवर नजीबुल्लाह झादरान (Najibullah Zadran) याला बाद देण्यात आले. मात्र, झादरान याने रिव्हियूची मागणी केली. तिसऱ्या पंचांकडे मैदानावरील पंचांचा निर्णय बदलण्यासाठी आवश्यक पुरावा नव्हता, तरीही झादरानला नॉट आऊट घोषीत केले. पंचाच्या या निर्णयावर हसरंगाने नाराजी व्यक्त केली.
श्रीलंका आणि अफगणिस्तान संघात खेळलेल्या या सामन्यात श्रीलंकेने अफगणिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयासोबत श्रीलंकेने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पहिल्यांदा फलंदाजी करत अफगणिस्तानने इब्राहिम झादरान याच्या शतकाच्या बळावर 8 गडी गमावत 313 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाने 6 गडी गमावत 314 धावा केल्या. या सामन्यात अफगणिस्तान संंघाकडून इब्राहिम झादरान याने धमाकेदार शतकीय खेळी केली. त्याने 138 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 162 धावा केल्या. मात्र, त्याची ही खेळी वाया गेली आणि संघाला पराभवाचा सामना करावा लागला. (Srilankan Spinner Wanindu Hasaranga got penalty over his displessure towards Umpire’s decision )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
FIFA WORLD CUP: रोनाल्डोच्या पोर्तुगालला हरवत कोरिया सुपर-16 मध्ये! कमनशिबी उरूग्वे स्पर्धेबाहेर
‘भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठीच वेळ नाही?’ विदेशातील लीग खेळण्यावरून दिग्गजाचा टोला