भारत आणि श्रीलंका यांच्यात शुक्रवारी (२३ जुलै) प्रेमदासा स्टेडियमवर पार पडलेल्या तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात, श्रीलंका संघाने भारतीय संघाला जोरदार प्रत्युत्तर दिले. या सामन्यात श्रीलंका संघाने जोरदार पुनरागमन करत, ३ गडी राखून विजय मिळवला. ही मालिका भारतीय संघाने २-१ ने आपल्या नावावर केली. परंतु या विजयासह श्रीलंका संघाला १० गुणांची महत्वपूर्ण कमाई करता आली आहे.
या सामन्यात भारतीय संघाने ५ युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी दिली होती. तसेच या सामन्यात नाणेफेक जिंकून, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून पृथ्वी शॉने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली, तर आपला पहिलाच वनडे सामना खेळत असलेल्या, संजू सॅमसनने ४६ धावांचे बहुमुल्य योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ४७ षटकात अखेर २२५ धावा करण्यात यश आले होते.
पावसामुळे हा सामना काही वेळ थांबवण्यात आला होता. त्यानंतर हा सामना ४७ षटक खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. श्रीलंका संघाला विजयासाठी ४७ षटकात २२७ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना, श्रीलंका संघाकडून अविष्का फर्नांडोने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली, तर भानुका राजपक्षणाने बहुमुल्य ६५ धावांचे योगदान दिले. याच खेळीच्या जोरावर श्रीलंका संघाला ३ गडी राखून विजय मिळवण्यात यश आले.
दहा गुणांची केली कमाई
गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश आलेल्या, श्रीलंका संघाने हा सामना ३९ व्या षटकात ३ गडी शिल्लक असतानाच आपल्या नावावर केला. या विजयासह श्रीलंका संघाने आयसीसी विश्वचषक सुपर लीग स्पर्धेत महत्वाच्या १० गुणांची कमाई केली आहे. (Srilnka beat India in 3rd odi match,got 10 points in world super league table)
सुपर लीगच्या यादीत श्रीलंका संघ कुठल्या स्थानी??
भारतीय संघाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवत श्रीलंका संघाने यावर्षी आपला दुसरा विजय मिळवला आहे. यावर्षी ४ वनडे मालिका खेळून झाल्यानंतर, श्रीलंका संघाने एकूण २२ गुणांची कमाई केली आहे. श्रीलंका संघ आपल्या कामगिरीमुळे ११ व्या क्रमांकावर आहे, तर भारतीय संघ ४९ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीतील सर्वोत्तम ७ संघाला थेट विश्वचषक स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे, तर उर्वरित संघांमध्ये स्पर्धा पाहायला मिळू शकते.
कुठला संघ कुठला स्थानी?
१) इंग्लंड: १५ सामन्यात ९५ गुण
२)बांगलादेश: १२ सामन्यात ८० गुण
३)ऑस्ट्रेलिया: ७ सामन्यात ५० गुण
४)भारत: ८ सामने ४९ गुण
५)पाकिस्तान:९ सामने ४० गुण
६)आयर्लंड: १२ सामने ३५ गुण
७)न्यूझीलंड: ३ सामन्यात ३० गुण
८) अफगाणिस्तान: ३ सामन्यात ३० गुण
९)वेस्ट इंडिज: ६ सामन्यात ३० गुण
१०)दक्षिण आफ्रिका: ६ सामने २४ गुण
११)श्रीलंका: १२ सामने २२ गुण
१२)नेदरलँड: २ सामने २० गुण
१३) झिम्बाब्वे: ३ सामने १० गुण
महत्त्वाच्या बातम्या-
-विराटसेनेला दुखापतींनी घेरले; भारतीय दिग्गज म्हणाले, भुवीसह ‘या’ ३ खेळाडूंना इंग्लंडला पाठवा
-“आधी बाबर आजमला २०-३० हजार धावा करु द्या, मग त्याची तुलना विराट कोहलीशी करा”