राजस्थान रॉयल्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धचा आयपीएल 2023चा 56वा सामना 9 विकेट्स राखून खिशात घातला. गुरुवारी (दि. 11 मे) पार पडलेल्या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला असला, तरीही संघाचा स्टार खेळाडू जोस बटलर याला बीसीसीआयने मोठा दंड ठोठावला आहे. त्याला सामना शुल्कातून काही रक्कम दंडाच्या स्वरूपात भरावी लागणार आहे. चला तर जाणून घेऊयात, बटलर याने नेमकं काय कृत्य केलं, ज्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला.
आयपीएलच्या आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी जोस बटलर (Jos Buttler) दोषी आढळला, त्यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर दंड ठोठावला. बटलरने त्याची चूक मान्य केली, ज्यामुळे ही कारवाई पुढे वाढवली नाही.
आयपीएलने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, “राजस्थान रॉयल्स संघाचा फलंदाज जोस बटलरवर कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स संघात 11 मे रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये टाटा इंडियन प्रीमिअर लीग 2023च्या 56व्या सामन्यादरम्यान आयपीएल आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी सामना शुल्काच्या 10 टक्के दंड ठोठावला आहे.”
या पत्रकानुसार बटलरने आयपीएलच्या आचार संहितेचे कलम 2.2 अंतर्गत 1 स्तराचा गुन्हा स्वीकारला. आचार संहितेच्या 1 स्तराच्या उल्लंघनासाठी सामना अधिकाऱ्यांचा निर्णय अंंतिम आणि बंधनकारक असतो. आयपीएल आचार संहितेचे कलम 2.2 सामन्यादरम्यान क्रिकेटचे उपकरण किंवा कपडे, मैदानातील वस्तूंशी दुरुपयोगाशी संबंधित आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, धावबाद झाल्यानंतर जोस बटलर जेव्हा तंबूच्या दिशेने परतत होता, तेव्हा त्याने रागाच्या भरात सीमारेषेवर आपली बॅट मारली. त्यामुळे त्याला हा दंड ठोठावण्यात आला आहे.
सामन्याविषयी थोडक्यात
या सामन्याविषयी बोलायचं झालं, तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्स गमावत 149 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने 13.1 षटकात 1 विकेट गमावत 151 धावा केल्या. या विजयात यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) आणि कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) यांचा मोलाचा वाटा होता. जयसवालने सामन्यात नाबाद 98, तर सॅमसनने नाबाद 48 धावांचे योगदान दिले. (star cricketer jos buttler has been fined 10 percent of his match fee for breaching the ipl code of conduct during match 56 kkr)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हे’ 6 खेळाडू गुजरातला पोहोचवणार प्ले-ऑफमध्ये? यादीत चार नावे भारतीय
‘IPLनंतर टी20 संघात सर्वात पहिली निवड…’, जयसवालची वादळी बॅटिंग पाहून शास्त्रींचे लक्षवेधी वक्तव्य