अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी याचा बार्सिलोना फुटबॉल क्लबसोबतचा प्रवास संपला आहे. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी बार्सिलोना फुटबॉल क्लबसोबत तो जोडला गेला होता. मात्र जवळजवळ कारकिर्दीची २१ वर्षे बार्सिलोना फुटबॉल क्लबसोबत घालवल्यानंतर अखेर त्याला या संघाची साथ सोडावी लागली आहे. स्वत: बार्सिलोना फुटबॉल क्लबने यासंबंधी माहिती दिली आहे.
मेस्सीचा बार्सिलोनासोबतचा करार ३० जून रोजीच संपुष्टात आला होता. यानंतर त्याला इतर कोणत्या फुटबॉल क्लबसोबत जोडले जाण्याचे स्वातंत्र्य होते. अशी वृत्तेही पुढे आली होती की, पगाराच्या रक्कमेत कपात झाल्यानंतरही मेस्सी आपला जुना फुटबॉल क्लब बार्सिलोनासोबतच पुढील प्रवास करण्यास तयार होता. मात्र आता या अफवांवर पूर्णविराम लागला आहे. (Lionel Messi to leave FC Barcelona)
कशामुळे मोडला मेस्सीचा बार्सिलोनासोबतचा करार?
यासंबंधी माहिती देताना बार्सिलोना फुटबॉल क्लबने सांगितले आहे की, “बार्सिलोना फुलबॉल क्लब आणि लियोनेल मेस्सी यांच्यात करारासंदर्भात बोलणे झाले होते. दोघांचीही करारावर स्वाक्षरी करण्यास सहमती होती. परंतु आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या अडचणींमुळे हे शक्य होऊ शकलेले नाही. परिणामी मेस्सी बार्सिलोना फुटबॉल क्लबचा भाग असणार नाही. आमची आणि मेस्सीची इच्छा अखेर पूर्ण होऊ शकली नाही याचे आम्हाला दु:ख आहे. त्याने क्लबसाठी दिलेल्या योगदानांसाठी खूप खूप धन्यवाद. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”
LATEST NEWS | Leo #Messi will not continue with FC Barcelona
— FC Barcelona (@FCBarcelona) August 5, 2021
बार्सिलोना फुटबॉल क्लबवर आहे कर्जाचं ओझं
स्पॅनिश फुटबॉल लीग ला लीगाचे अध्यक्ष झेवियर टेबस यांनी मागील आठवड्यातच सांगितले होते की, “स्पेनच्या सर्वात मोठ्या फुटबॉल क्लबवर १.१८ बिलियन डॉलर्सचे कर्ज आहे.”
जर हे भारतीय चलनात पाहायचं झाल, तर हे कर्ज जवळपास ८ हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. मेस्सीचा सन २०१७ मधील करार हा सर्व जगाच्या भुवया उंचावणारा होता. त्याने या करारांतर्गत त्याला ५ वर्षांसाठी तब्बल ५५० मिलियन यूरो मिळाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
बिडीच्या पॅकेटवर झळकला मेस्सी, तर नेटकऱ्यांकडून आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
विक्रमी विजयानंतर घरी परतल्यावर मेस्सीचे पत्नीकडून ‘खास वेलकम’, व्हिडिओ व्हायरल