भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान टी20 विश्वचषकाआधी ब्रिस्बेन येथे सराव सामना खेळला गेला. मुख्य स्पर्धेआधी महत्त्वाच्या असलेल्या भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी संयम दाखवत ऑस्ट्रेलियाला 6 धावांनी पराभूत केले. मात्र, भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना संघाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव हा गंभीरपणे जखमी होण्यापासून थोडक्यात वाचला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
भारतीय संघ संकटात सापडलेला असताना सूर्यकुमार यादव याने पुन्हा एकदा भारतीय डावाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने अप्रतिम खेळ दाखवत 33 चेंडूवर 50 धावांची खेळी केली. यामध्ये 6 चौकार व एका षटकाराचा समावेश होता.
https://twitter.com/theunkn30204658/status/1581880587165392896?t=7y8_Y-j3aAc8OY7AzlfN_w&s=19
मात्र, भारतीय डावाच्या 19 व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज गोलंदाज मिचेल स्टार्क याच्या चेंडूचा सामना करताना सूर्यकुमार दुखापतग्रस्त होण्यापासून थोडक्यात बचावला. सूर्यकुमार आपल्या नेहमीच्या शैलीत स्कूप फटका खेळू इच्छित होता. मात्र, त्याचा अंदाज चुकल्याने तो चेंडू थेट त्याच्या हेल्मेटवर लागला. स्टार्कने खिलाडूवृत्ती दाखवत लगेच त्याच्याजवळ जात त्याची विचारपूस केली. भारतीय संघाचे फिजिओ मैदानावर आल्याने सामना काही काळ थांबवावा लागला. सुदैवाने सूर्यकुमारला ही गंभीर दुखापत झाली नाही.
या सामन्याचा विचार केला गेला तर, दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा होता. दोन्ही संघांनी विश्वचषकाची तयारी म्हणून या सामन्यात आपले प्रमुख संघ उतरवले. भारतीय संघाने सूर्यकुमार यादव व केएल राहुल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 7 बाद 186 धावा उभारल्या. प्रत्युत्तर ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार ऍरॉन फिंचने एकाकी झुंज देत 79 धावा केल्या. अखेरच्या षटकात 11 धावांचा बचाव करत मोहम्मद शमी ने भारतीय संघाला सहा धावांनी विजय मिळवून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहली टी20 विश्वचषकानंतर होणार निवृत्त? प्रशिक्षकानींच केला खुलासा!
विराट भाऊंनी मैदानावरच धरला ठेका, संघसहकाऱ्यांसमोर केला ‘असा’ डान्स; तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात’