---Advertisement---

पत्नीचा विश्वचषकातील खेळ पहाण्यासाठी क्रिकेटर करणार हजारो मैलांचा प्रवास

On: शनिवार, मार्च 7, 2020 12:20 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिका सध्या सुरू आहे. यजमान दक्षिण आफ्रिकेने 3 सामन्यांची मालिका 2-0 अशी आधीच खिशात घातली आहे. मालिकेतला तीसरा सामना 7 मार्चला होणार आहे. पण या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा हुकुमी जलदगती गोलंदाज मिशेल स्टार्क ऑस्ट्रेलियाला परतणार असल्याने हा सामना खेळणार नाही.

मिशेल स्टार्क त्याची पत्नी एलिसा हेलीला महिला टी20 विश्वचषकाचा अंतिम सामन्यात खेळताना बघण्यासाठी ऑस्ट्रेलियाला परतणार आहे. त्याची पत्नी अलिसा हिली ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची यष्टीरक्षक फलंदाज आहे.

रविवारी (8 मार्च) मेलबर्न (Melbourne) येथे भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात टी20 विश्वचषकातील अंतिम सामना रंगणार आहे.

या अंतिम सामन्यासाठी स्टार्कच्या ऑस्ट्रेलियाला परतण्याबद्दल ऑस्ट्रेलिया पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी सांगितले की “मायदेशात विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मिशेलला एलिसाला खेळताना पहाण्याची संधी मिळत आहे, अशी संधी खूप क्वचितच येते. त्यामुळे आम्ही मिशेलला ऑस्ट्रेलियाला परतण्यासाठी परवानगी दिलेली आहे. आमच्याकडे या दौऱ्यात मिशेल स्टार्कशिवाय जोश हेझलवूड, जाईल रिचर्डसन आणि केन रिचर्डसन यांचे पर्याय आहेत.

स्टार्क आणि हेली या दोघांनीही ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. असे करणारे ते इंग्लंडच्या रॉजर प्रिडूक्स आणि रूथ वेस्टब्रुक तसेच श्रीलंकेच्या गाय दे अल्विस आणि रसांजली चंडिमा सिल्वा यांच्या नंतरचे केवळ दांपत्य आहे.

तसेच हेली आणि स्टार्क या दोघांनाही याआधी विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. हेलीला २०१८ ला झालेल्या महिला टी२० विश्वचषकाचा तर स्टार्कला २०१५च्या ५० षटकांच्या पुरुष विश्वचषकाचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली पती-पत्नीची जोडी आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

टी२० वर्ल्डकप फायनलमध्ये खेळाडू नाही चाहते मोडू शकतात हा मोठा विश्वविक्रम

ऑस्ट्रेलियाची ही खेळाडू म्हणते, मला भारताविरुद्ध खेळण्याचा तिरस्कार वाटतो, कारण…

निवड समितीच्या नवीन अध्यक्षाचे विराटशी असलेले हे जुने नाते माहित आहे का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---