नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 203 धावांनी मोठा विजय मिळवला.
या सामन्यात जसप्रीत बुमराहने ७ विकेट्स घेतल्या, हार्दिक पंड्याने ७ विकेट्स आणि अर्धशतकी खेळी केली तर विराट कोहली पहिल्या डावात ९७ आणि दुसऱ्या डावात १०३ धावा केल्या.
या सामन्यात अनेक विक्रम झाले. त्यातील काही खास विक्रम-
- ५१५- जिंकलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय कर्णधाराने मारलेले सर्वाधिक चौकार
- ४००- कसोटीत भारतीय कर्णधाराने मारलेले षटकार. अशी कामगिरी करणारा कोहली एकमेव भारतीय कर्णधार
- ६- विराटचे कसोटीतील कर्णधार असतानाचे सामनावीर पुरस्कार, भारतीय कर्णधाराने कसोटीत मिळवलेले सर्वाधिक सामनावीर पुरस्कार, अशियातील दुसराच कर्णधार
- ५- आशिया खंडाबाहेर झिंबांब्वे वगळुन सामनावीर पुरस्कार मिळालेला विराट हा कपिल देव, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरनंतरचा ५वा कर्णधार
- ८- कसोटी क्रिकेटमधील विराटचा सामनावीर पुरस्कार, भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडूलकर (१४), राहुल द्रविड (११) आणि अनिल कुंबळेनंतर (१०) चौथा
- २- कपिल देवनंतर इंग्लंडमध्ये सामनावीर ठरलेला दुसराच कर्णधार
- १४- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा जिंकलेल्या सामन्यात ५० किंवा अधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर
- ३- भारतीय संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत पहिले दोन सामने पराभूत झाल्यावर केवळ तिसऱ्यांदा तिसरा सामना जिंकला आहे
- ४- अशिया खंडाबाहेर विराट कोहलीने १२ कसोटीत चौथा सामना जिंकला. यापुर्वी गांगुलीने २१ सामन्यात ६ तर धोनीने २६ सामन्यात ४ कसोटी सामने जिंकले आहेत.
- ८- अशिया खंडाबाहेर भारताने २ किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामने ८ वर्षी जिंकले आहेत. २०१६मध्ये विंडीजमध्ये २ तर यावर्षी दक्षिण आफ्रिका आणि आजच्या इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटीचा समावेश
- १९- भारतीय वेगवान गोलंदाजांनी कसोटीत १९ विकेट घेण्याची दुसरी वेळ. यापुर्वी जोहान्सबर्ग कसोटीत जानेवारीत वेगवान गोलंदाजांनी २० विकेट्स घेतल्या होत्या.
- ३- दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये कसोटी सामना जिंकणारा विराट द्रविड आणि धोनीनंतरचा तिसरा कर्णधार
- २२- विराट कोहलीचा कर्णधार म्हणुन २२वा कसोटी विजय. एमएस धोनी २७ विजयासह अव्वल स्थानी तर २१ विजयासह सौरव गांगुली तिसरा
- ६- इंग्लंडमध्ये कसोटी सामना जिंकणारा विराट अजित वाडेकर, कपिल देव (२), सौरव गांगुली, राहुल द्रविड, एमएस धोनीनंतरचा सहावा कर्णधार
- २- नाॅटिंगहॅमला टीम इंडियाने दुसरा कसोटी सामना जिंकला. इंग्लंडमध्ये कसोटीत लाॅर्ड्स आणि लिड्सला भारताने दोन विजय मिळवले आहे तर एक विजय ओव्हलवर मिळवला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–अखेर कोहलीच्या टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडला पाजले पाणी
–कसोटी सामन्यात संपुर्ण दिवसात टाकले गेले होते केवळ दोन चेंडू
–पाचव्या दिवशी १ विकेट बाकी असताना यापुर्वी १० सामन्यांत नक्की काय झाले होते?