नागपूर । ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत वनडे मालिकेतील ५व्या आणि शेवटच्या वनडेत भारतीय संघाने ७ विकेट्सने सामना जिंकला आणि मालिका ४-१ अशी खिशात घातली.
याबरोबर भारतीय संघाने अनेक विक्रम केले. त्यातील काही खास विक्रम-
– कर्णधार म्हणून विराटने दोन देशात झालेल्या वनडे मालिकेत ६ मालिका जिंकल्या आहेत.
– २००८ नंतर २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा आणि ५ विकेट्स दोन संघात खेळलेल्या वनडे मालिकेत घेणारा हार्दिक पंड्या पहिला खेळाडू बनला आहे.
– भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत २०१३, २०१६ आणि २०१७ मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनण्याचा मान रोहित शर्माला मिळाला आहे.
-अजिंक्य रहाणेने शेवटच्या १४ सामन्यात ८ अर्धशतके आणि १ शतक केले आहेत.
-भारतीय सलामीवीरांनी ८व्यांदा २०१७ मध्ये शतकी सलामी दिली आहे. हा भारताकडून विक्रम आहे.
– या मालिकेत रहाणेने सलग ४ सामन्यात ४ अर्धशतके केली आहेत. या वर्षी झालेल्या विंडीज मालिकेतही त्याने सलग ४ अर्धशतके केली होती.
-ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग ४ अर्धशतके करणारा रहाणे हा सचिन आणि विराटनंतरचा केवळ तिसरा खेळाडू आहे.
-ऑस्ट्रेलिया संघ दोन संघात झालेल्या वनडे मालिकेत केवळ ६व्यांदा ४ सामने हरला आहे.
– भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत भारतीय संघाने प्रथमच ऑस्ट्रेलियाला ४ सामन्यात पराभूत केले आहे.
– कर्णधार म्हणून पहिल्या ४० वनडे सामन्यात विराटने ३१ विजय मिळवले आहेत. रिकी पॉन्टिंग(३३), व्हिव्हियन रिचर्ड(३१) आणि क्लीव्ह लॉईड(३१) यांनी अशी कामगिरी केली आहे.
– रोहित शर्माने या मालिकेत तब्बल १४ षटकार खेचले आहेत.
– एखाद्या आशियायी देशाने प्रथमच ऑस्ट्रेलिया संघाला ४ सामन्यात पराभूत केले आहे.
– भारत देशात ऑस्ट्रेलिया संघाचा ५०वा वनडे पराभव आहे. इंग्लंड देशात ते ४९ वनडे सामन्यात पराभूत झाले आहेत.
-या वर्षी वनडेत सार्वधिक षटकार खेचणाऱ्या खेळाडूंमध्ये २९ षटकारांसह रोहित शर्मा अव्वल. हार्दिक पंड्या २८ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर.
-रोहित शर्माने वनडेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध ६ शतक केले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक शतकी खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर(९) आणि डेस्मंड हेन्स(६) यांच्यानंतर रोहित ह्या यादीत दुसरा.
-रोहित शर्माची ही १४वे वनडे शतक होते.
– रोहित शर्माचे सलामीवीर म्हणून हे १२वे शतक होते.
-रोहित शर्माचे हे भारतातील ५वे वनडे शतक होते.
-रोहित शर्माने २०१७मध्ये ४थे शतक केले आहे.
-भारतात सर्वात वेगवान २००० वनडे धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर.
– सलामीवीर म्हणून वेगवान ४०००धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरा.